Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : पुण्यातील एल्गार परिषदेला पोलिसांची परवानगी नाही

Spread the love

राज्यातील कोरोना संसर्गाचे कारण देत पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमा येथील शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.  लोकशासन संवादतर्फे ही सांस्कृतिक परिषद घेण्यात येणार होती. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी या परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता आयोजक काय भूमिका घेतात, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दरम्यान १  जानेवारी २०१८ मध्ये भीमा कोरेगाव परिसरात द्विशताब्दी शौर्यदिन साजरा केला जात असतानाच जवळच असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला होता. सणसवाडीत हा वाद शिगेला पोहचला होता. तिथे अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला होता. भीमा कोरेगावच्या या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते. त्याचा गैफायदा घेत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाकंटकांनी केला होता . पुण्यातील एल्गार परिषदेवरून अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले .  दरम्यान, याच हिंसाचार प्रकरणात हात असल्याच्या आरोपाखाली तेव्हा घेण्यात आलेल्या एल्गार परिषदेतील अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून ते तुरुंगात आहेत. एनएसए कडून त्याचा तपस चालू आहे.

दरम्यान पुण्यात एल्गार सांस्कृतिक परिषद होणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर दुसरीकडे एल्गार परिषदेला सर्वांगीण अभ्यास करूनच परवानगी द्यावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे केली होती. पुण्यातील गणेश क्रीडा कला केंद्रात ही परिषद घेण्याचा निर्णय पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे. आता पोलिसांनी परवानगी नाकारल्या नंतर परिषदेची भूमिका काय राहील असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!