Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात ४ हजार २६ नवीन रुग्णांचे निदान, ६ हजार ३६५ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात ४ हजार २६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ६ हजार ३६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ९३.४२ टक्क्यांवर पोहचला असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७३ हजारपर्यंत खाली आली आहे. राज्यात गेले काही दिवस कोरोना मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. आज राज्यात करोनाने ५३ रुग्ण दगावले असून आतापर्यंत या आजाराने एकूण ४७ हजार ८२७ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. आज सर्वाधिक ७ मृत्यूंची नोंद मुंबई पालिका हद्दीत तर ६ मृत्यूंची नोंद पुणे पालिका हद्दीत झाली आहे. राज्यातील करोना मृत्यूदर आज २.५७ टक्के इतका असून तो आणखी खाली आणण्यासाठी आरोग्य यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्यात आजही नवीन कोरोना बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक राहिला. गेल्या २४ तासांत ४ हजार २६ नवीन रुग्णांची भर पडली तर त्याचवेळी ६ हजार ३६५ रुग्ण करोनातून बरे होऊन आज घरी परतले. आतापर्यंत एकूण १७ लाख ३७ हजार ८० रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ९३.४२ टक्के इतके झाले आहे. करोना चाचण्यांचा आकडाही खूप मोठा आहे. आतापर्यंत एकूण १ कोटी १३ लाख ७७ हजार ७४ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातील १८ लाख ५९ हजार ३६७ चाचण्यांचे (१६.३४ टक्के) अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४८ हजार ९६१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ५ हजार ६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची ( अॅक्टिव्ह रुग्ण ) संख्या आज ७३ हजार ३७४ इतकी खाली आली आहे. त्यात पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील आकडा सर्वात जास्त म्हणजे १५ हजार ३४४ इतका आहे. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात करोनाचे १४ हजार ३९ तर मुंबई पालिका हद्दीत करोनाचे १२ हजार २३१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

देशात कोरोनाबाधितांच्या  संख्येत सातत्याने घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी  २४ तासांत २६,५६७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ३८५ हून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ महिन्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ४.१० टक्के केसेस ॲक्टिव्ह आहेत. ९४.४५ टक्के कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १.४५ टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात ३,८३, ८६६ रुग्ण ॲक्टिव्ह असून, ९१,७८,९४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.१,४०,९५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत देशात ३९, ०४५ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १२,८६३ ने घटली आहे. तसेच ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ९७,०३,७७० आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देशभरातील १०,२६,३९९ नागरिकांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशभरात १४,८८,१४,०५५ नागरिकांची कोरोनाच्या अनुषंगाने चाचण्या करण्यात आल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!