Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MahaparivanDinSpecial : राष्ट्रपती , पंतप्रधान , मुख्यमंत्री , राज्यपाल यांच्यासह देशात सर्वत्र बाबासाहेबांना मानवंदना

Spread the love

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद , पंतप्रधान नरेंद्र मोदी , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेसनेते राहुल गांधी , देशभरातील सर्वच राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह  कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच खासदार शरद पवार यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. विशेष म्हणजे या वर्षी कोरोनामुळे आंबेडकरी अनुयायांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोणतीही गर्दी केली नाही. देशभर बाबासाहेबांना मानवंदना दिली जात आहे.

यावेळी आपली आदरांजली अर्पण करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  म्हणाले कि , दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सागराशी स्पर्धा करणारा भीमसागर येथे येतो. परंतु कोरोनामुळे वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले आहे.  भारतरत्न डॉ .बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणाला आणि एकूणच त्यांच्या कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि सर्वांनी शिस्तीचे पालन केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

राहुल गांधी यांचे अभिवादन

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

यावेळी राज्यपाल म्हणाले, कोरोनामुळे सर्व जग त्रस्त आहे, सगळ्या जगात भारतापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे आणि भारतात त्या मानाने मृत्यू संख्या कमी आहे याचे कारण एकच आहे की, भगवान बुद्धांनी करुणा, दयेचा जो विचार लोकांना दिला हाच विचार बाबासाहेबांनी स्वीकारला, आणि याच विचारांच्या आधाराने आपण कोरोनाला हरवू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रमाने आणि बलिदानाने पुन्हा एकदा आपला देश नवे शिखर गाठेल, सर्वजणांनी एकत्र येऊन  बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू,  आज संपूर्ण देश त्यांना  अभिवादन करीत आहे. माझे ही त्यांना विनम्र अभिवादन.

उपमुख्यमंत्री अजित पवार

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंघ, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला आहे. एक शक्तिमान देश म्हणून भारताची ओळख जगात व्हावी हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होवू या. त्याचबरोबर इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत . भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

चैत्यभूमीवरील अभिवादन सभेला यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाला मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुबंईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल चहल आदी उपस्थित होते.

मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. मात्र, यंदा खबरदारीची योजना म्हणून कोविड विषाणूचा संसर्ग फैलावू नये यासाठी अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी करण्यात आले. या आवाहनाला अनुयायांनी संपूर्ण सहकार्य केल्याचे दिसून येत असून चैत्यभूमीवर नागरिक आलेले नसल्याचे पहावयास मिळाले. हा प्रतिसाद कौतुकास्पद आहे, असे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी काढले.

विधान भवनाच्या प्रांगणात

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्‍हे आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले, अवर सचिव रविंद्र जगदाळे, सभापतींचे सचिव महेंद्र काज आदिंसह विधानभवनातील अधिकारी व कर्मचा-यांनीही गुलाबपुष्प अर्पण करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि राज्यपाल

आपलं सरकार

Click to listen highlighted text!