BreakingNewsAurangabad : हवेत फायरिंग करत दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण

औरंगाबाद : हवेत फायरिंग करीत औरंगाबाद शहरात दिवसाढवळ्या एका बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहराती देवा नगरी भागात बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नाझीम पठाण राउफ पठाण असं अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. पांढऱ्या रंगांच्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चार अज्ञात हल्लेखोरांनी अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेली माहिती अशी की, पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करत बांधकाम व्यावसायिकांचे अपहरण केले. शहरातील देवानगरी जवळील पीडब्ल्यूडी कॉलनीत घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहे.
या धक्कादायक घटनेप्रकरणी अधिक माहिती अशी की, बँकेत नोकरी करीत असलेले मदन अवधूत भोसले यांच्या घराच्या बांधकामचा ठेका पठाण यांनी घेतला होता. आज सकाळी ते साईडवर आले व कामगारांकडून बांधकामाची माहिती घेत असताना अचानक एका पांढऱ्या रंगाच्या एका चारचाकी वाहनातून तीन ते चार व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी पठाण यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्याचवेळी त्यांना धक्का देत यांना गाडीमध्ये ढकलत हवेत गोळीबार करून तेथून पसार झाले.
बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्याने कामगारांनी बाहेर येऊन पाहिले असता हल्लेखोरांनी तोपर्यंत पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र मळाले, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासह पथकांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली.