AurangabadCrimeUpdate : देहविक्रय करणार्या महिलेकडून १ लाख ६० हजाराचे दागिने जप्त

औरंगाबाद – देहविक्री करणार्या महिलेकडून चार तोळ्यांचे १ लाख ६० हजारांचे दागिने गुन्हेशाखेने जप्त करंत तिला अटक केली. कोव्हिडमुळे देहविक्री व्यवसायावर भयंकर परिणाम झाला त्यामुळे हा चोरीचा जोडधंदा आपण सुरु केल्याचा जबाब अटक महिला आरोपींने पोलिसांना दिला. हा जबाब ऐकून पोलिसही सुन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि . २९आॅक्टोबर रोजी उघड्या घरातून रमोला (नाव बदलले) हिने तिच्या १३ वर्षीय भावाला सोबंत घेत सिडको परिसरातील पोस्टआफिस समोरील परिसरातील सुप्रिया तुरे यांच्या उघड्या घरात प्रवेश करून पर्स उचलून नेली. गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास सुरु केल्यानंतर सी.सी.टि.व्ही. फुटेज चेक केले. त्यामधे आरोपी महिला आढळली. कुख्यात विकी हेल्मेट ची सख्खी बहीण असल्याचे पोलिसांना कळले. तिला ताब्यात घेतल्यानंतर रमोला ने चोरलेले दागिने तिचा प्रिय मित्र सत्ता उर्फ सतीश नवगिरे रा. आंबेडकरनगर याच्या घरी ठेवल्याचे सांगितले सत्तावरही खुनाचा प्रयत्न करणे व अन्य गुन्हे दाखल आहेत. वरील कामगिरी पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय जाधव यांनी पार पाडली. या कारवाईत त्यांच्या सोबंत पोलिस कर्मचारी नजीर पठाण, परभत म्हस्के, संदीप बीडकर, विजय भानुसे, नितीन धुळे, मोहिनी चिंचळकर यांनी सहभाग घेतला होता.