AurangabadCrimeUpdate : मुलाचा लाकडी दांड्याने खून, आई सह एकास अटक

घरगुती कारणावरून एका ३५ वर्षीय तरूणाची लाठ्या काठ्याने मारहाण करून खुन करण्यात आल्याची घटना दौलताबाद येथील आसेगाव येथे घडली. हा खुन मृतांच्या आई व दाजी यांनी केल्याच्या संशयावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दौलताबाद पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.
दौलताबाद पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा शामराव शेळके (३५) रा. आसेगाव, दौलताबाद असे मृतकाचे नाव आहे. कृष्णा हा शेतकरी होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो पत्नी आणि मुलांना मारहाण करित होता. सोमवारी (२ नोव्हेंबर ) दुपारी तीन वाजेच्या सुमारास कृष्णा याला लाठ्या काठ्याने मारहाण करण्यात आली होती. जखमी अवस्थेत कृष्णा ला सोडून मारेकरी निघून गेले होते. संध्याकाळी शेतातून कृष्णाच्या परिवारातील सदस्य परत आले. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपायुक्त निकेश घाटमोडे पाटील, दौलताबाद पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे, पोलिस उपनिरीक्षक कदम पोहोचले. त्यांनी प्राथमिक माहिती वरून मृत कृष्णाकी आई केशरबाई शेळके आणि दाजी या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
………
खुनाची पाचवी घटना
गेल्या दोन महिन्यात शहरात ही पाचवी खुनाची घटना आहे. दौलताबाद परिसरात दुसरी खुनाची ही घटना आहे. एमआयडीसी वाळूज मध्ये एक तर छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन खुनाच्या घटना आतापर्यंत झालेल्या आहेत