AurangabadCrimeUpdate : धक्कादायक : घरात झोपलेल्या चिमुकलीला पांघरुणासह उचलून नेत अत्याचाराचा प्रयत्न, नराधमाने तोडले ओठाचे लचके !!

औरंगाबाद : अजीसह घरात झोपलेल्या सात वर्षीय चिमुकलीला पांघरुणासह एका खुल्या प्लॉट मध्ये उचलून नेत अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला.तर नराधमाने चिमुकलीच्या ओठाचे लचके तोडले. मुलीने आरडाओरड केल्यानंतर आरोपी पसार झाला. ही घृणास्पद घटना मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शहरा नजीकच्या वडगाव कोल्हाटी येथे घडली.पोलीस त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव कोल्हाटी येथे गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 7 वर्षीय चिमुकली मिस्त्री काम करणाऱ्या आजी व मामाकडे आलेली होती. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास पत्र्याच्या शेडमध्ये आजी सह झोपलेल्या मुलीला आरोपीने घरातून अलगद पांघरुणासहीत उचलून नेले. त्यानंतर जवळच्या रिकाम्या प्लॉटमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान भयानक बाब म्हणजे अत्याचार सुरू असताना या नराधमाने पीडित चिमुरडीचा ओठ दाताने चावून तोडला. यावेळी मुलगी जोरात ओरडल्याने शेजारील लोकं येतील या भीतीने आरोपीने तिथेच तिला सोडून धूम ठोकली. त्यानंतर आवाज झाल्यामुळे लोकांनी धाव घेतली असता धक्कादायक प्रकार समोर आला. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेतील मुलीला औरंगाबादमधील शासकीय घाटी रुग्णालयात रवाना केले. मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान घटनेची माहिती होताच पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे सह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली शिवाय श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले होते.या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.