AurangabadCrimeUpdate : दारूसाठी पैसे मागतो म्हणून मित्राच्या मदतीने केला हमालाचा खून, दोघांना बेड्या

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – मजूरी दिल्यावरही दारु पिण्यासाठी सतत पैशे मागणार्‍या हमालाचा खून करणार्‍या सुपरवायझरसहित त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हेशाखेने नेवासा परिसरातील शेतातून अटक करुन आणले
१५आॅक्टोबर रोजी या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता.
मयत सुनिल शेजवळ(२४) रा.वडगाव कोल्हाटी व आरोपी प्रकाश जगताप(३६) रा. शिरेसायगाव गंगापूर हे वाळूज औद्योगिक परिसरातील एका खाजगी कंपनीत कामाला होते. सुनाल शेजवळ हा हमाल होता. तर प्रकाश जगताप हा सुपरवायझर होता. मजुरी मिळूनही सुनिल शेजवळ दारुसाठी प्रकाश जगताप लापैशे मागून त्रास देत असे. हा प्रकार असहय्य झाल्याने प्रकाश जगताप ने त्याचा मित्र उध्दव घोलपला  ही घटना सांगितली. दोघांनी सुनील  शेजवळ ला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण शेजवळ दमदाट्या करंत होता. म्हणून प्रकाश जगताप आणि उध्दव घोलप यांनी शेजवळ ला दूर नेत चाकूचे वार करुन १४ आॅक्टोबर रोजी त्याचा खून केला होता. गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी शेजवळशी संबंधित लोकांची चौकशी केल्यावर  जगताप गायब असल्याचे लक्षात आले. त्याच्या मोबाईलवरुन लोकशन काढले असता तो नेवासा परिसरातील नातेवाईकांकडे असल्याचे आढळले.त्याची विश्र्वासात घेत विचारपूस केली असता जगताप ने मित्राच्या मदतीने सुनिल शेजवळचा खून केल्याची कबुली दिली. वरील कारवाईत पोलिस निरीक्षक भागवत फुंदे,पीएसआय भगतसिंग दुलंत, संदीप सोळंके पोलिस कर्मचारी संदीप सोळंके, विठ्ठल राख, विक्रम देशमुख यांनी सहभाग घेतला होता.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!