AurangabadNewsUpdate : कुत्र्यांना घाबरून ” ती ” दोन दिवस झाडावर होती शेवटी रेस्क्यू ऑपरेशन करून फायर ब्रिगेड ने “तिची ” सुखरूप सुटका केली….

ज्योती नगर मध्ये शेख सलीम भाई यांच्या घरी पर्शियन जातीचे पाळीव मांजर घरातून बाहेर पडले पण पाठीमागे कुत्रे लागल्याने मांजराने त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या कविता बागेतील झाडाचा आधार घेतला. गेल्या दोन दिवसांपासून झाडाच्या शेंड्यावर हे मांजर घाबरून बसलेले होते. सलीम भाई यांच्या मुलींचा या मांजरावर मोठा जीव असल्याने त्यांनी त्याला झाडावरून काढण्यासाठी प्रयत्न केले परंतु ते खाली येण्याऐवजी आणखी वर चढत गेले . अखेरीस सलीम भाई यांनी अग्निशमन दलाला फोन करून त्यांना झाडावर अडकलेले मांजर काढण्याची विनंती केली . त्यानुसार अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन कारवाई सुरु केली पण यश मिळेना . शेवटी त्यांनी महापालिकेच्या विद्युत विभागाचे करेन मागवले आणि मोठ्या परिश्रमाने झाडावर अडकलेल्या मांजराला सुखरूप पकडून खाली घेतले आणि मुलींच्या स्वाधीन केले तेंव्हा हे रेस्क्यू ऑपरेशन पाहणाऱ्या मुलांनी टाळ्यांचा एकाच कडकडाट केला. यावेळी संतोष उदावंत, सय्यद सलीम भाई , सुनील सूर्यवंशी घटनास्थळी उपस्थित होते या सर्व प्रक्रियेसाठी उल्कानगरी येथील नगरसेवक दिलीपजी थोरात यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले.