Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaCrimeUpdate : आदिवासी मजूर महिलेवर वीटभट्टी चालकाचा बलात्कार

Spread the love

उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीटभट्टीवर कामावर असलेल्या तीस वर्षीय महिलेला पळवून नेऊन आठवडाभर तिच्यावर दुष्कर्म केल्याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अत्याचार करणारा वीटभट्टीचालक व अन्य तिघे फरार असून पोलीस यंत्रणा आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

याविषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , कर्नाटकातील झळकी (ता. बस्वकल्याण) येथील पारधी समाजातील एक कुटुंब उमरगा येथील लातूर मार्गालगत असलेल्या लक्ष्मीपाटी परिसरातील वीटभट्टीवर काम करते. १९ सप्टेंबरला सलीम शानेदिवाण हा पीडित महिलेच्या घरी आला. तुझ्यासोबत हा व्यक्ती कोण आहे? अशी विचारणा केली तेंव्हा पीडित महिलेने तो आपला भाऊ असल्याचे सांगताच सलीमने त्या महिलेला घरातून बाहेर आणले आणि लातूरमार्गे घेऊन गेले. त्यानंतर आठवडाभर तिच्यावर दुष्कर्म करून २६ सप्टेंबरला आरोपीने पीडित महिलेला आदम, पतराज व शहारूख यांच्या ताब्यात दिले. या तिघांनी त्या महिलेला कळंब पोलीस ठाण्याजवळ नेऊन सोडले. त्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात आपली कैफियत मांडली. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. या घटनेमुळे महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने आई-वडिलांनी तिला गावाकडे नेले. पीडित महिलेने सोमवारी रात्री उमरगा पोलीस ठाण्यात येऊन संपूर्ण हकीगत सांगितली. त्यानुसार, सलीम शानेदिवाण, आदम, पतराज व शहारूख या चौघांविरूद्ध अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!