Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationMaharashtra : आरक्षणावरून मराठा समाजात दोन प्रवाह , संभाजी ब्रिगेडने जाहीर केली ” हि ” भूमिका…

Spread the love

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला  स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यातील मराठा समाज अस्वस्थ झाला असून याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत राज्यसरकार आणि मराठा समाजाचे नेतेही संभ्रमित झाले असल्याने त्यांच्याकडून वेगवेगळी मते व्यक्त करण्यात येत आहेत .दरम्यान  मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी वेगळीच भूमिका घेतली होती. ‘मराठ्यांना EWS मधील आरक्षण देऊ नका. कारण हे आरक्षण घेतल्यास सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारे मिळणाऱ्या आरक्षणाबाबत कोर्टात जी लढाई सुरू आहे, तिच्यावर नकारात्मक परिणाम होईल,’ अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. मात्र या भूमिकेला आता संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी छेद दिला आहे. मराठा समाजातील या दोन मत प्रवाहामुळे राज्यातील मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये काय चर्चा होते आणि त्याचे काय परिणाम होणार यावरून आता चर्चा होत आहे.

‘एसईबीसी (SEBC) आरक्षण कोर्टात टिकणार नाही मात्र ईडब्लूएस (EWS) आरक्षण टिकेल. एसईबीसी आरक्षण मिळूच शकणार नाही. त्यामुळे EWS हे आर्थिक निकषावरील आरक्षण जे मिळतंय ते घ्यावं,’ अशी थेट भूमिका प्रवीण गायकवाड यांनी घेतली आहे. प्रवीण गायकवाड यांच्या मतानुसार चांदीच्या ताटात जेवण आहे ते जेवावे , सोन्याच्या ताटात जेवणच नाही मग काय उपयोग?  काही लोकांना आपलं नेतृत्व प्रस्थापितकरायचं आहे ,थोपवायचं आहे असा आरोप करताना प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे कि ,  obc मध्ये जर मराठा समाजाला टाकलं तर सिव्हिल वॉर होईल…सामाजिक स्वास्थ्य बिघडेल त्यामुळे राज्यात ,केंद्रात ews आर्थिक मर्यादा वाढवून घ्यावी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण घ्यावं . Sebc हे obc प्रवर्गात टिकणार नाही. शिवाय 50 टक्केची मर्यादा ओलांडली आहे, यामुळं sebc आरक्षण टिकणार नाही. किती पिढ्या वाट बघणार? ४०  वर्ष झाली. किती दिवस आरक्षण मुद्दा रेटायचा? आंदोलनात उतरायचं नाही. आरक्षण विषय संपवला पाहिजे.  Ews चं स्वागत केलं पाहिजे. खाजगीकरण झाल्याने नोकऱ्या नाहीत. सारथी ला ५००० कोटींची गरज आहे. दोन दिवस चाललेल्या संभाजी ब्रिगेडच्या बैठकीत या सर्व मुद्यांवर चर्चा झाल्याचे गायकवाड म्हणाले.

दरम्यान या मागणीसाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन चालूच आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्व आमदारांनी विशेष अधिवेशन बोलावन्यात यावे यासाठी आज मराठा क्रांती मोर्चातर्फे आमदारांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. भाजपच्या नेत्यांकडूनही राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आदोनलं सुरु आहेत. भाजप खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मात्र मराठा आरक्षणावर वेगळी भूमिका मांडली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!