Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पिडीतेबद्दल नव्हे तर सर्व महिलांच्या सुरक्षेबद्दल केले “हे” ट्विट

Spread the love

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ किंवा पंतप्रधान या घटनेबद्दल काही बोलतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना पब्लिकली  काहीही न बोलता मोदी यांनी योगींशी फोनवर संप्रर्क साधून या विषयीची माहिती घेतली . आणि त्या नंतर योगी यांनी पीडितेच्या पित्याशी चर्चा केली . दरम्यान या प्रकरणात सरकारवर चहुबाजूंनी टीका होत असताना योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे या प्रकरणावर भाष्य केलं आहे. मात्र त्यात या प्रकरणाचा कुठलाही थेट उल्लेख न करता जनरल ट्विट केले आहे. विशेष म्हणजे पीडित तरुणीच्या नातेवाईकांना तिच्यावर अंत्यसंस्कारही करु न दिल्याने देशभरामध्ये या प्रकरणावरुन योगी सरकारवर टीका केली जात आहे.

मुख्यमंत्री योगींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. “उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे,” असं योगी यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वच विरोधकांनी योगी सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गुरुवारी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन हाथरसमध्ये जाण्यास परवानगी दिली नाही. हाथरसमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. यामुळेच काँग्रेसविरुद्ध भाजपा असा थेट संघर्ष या प्रकरणावरुन झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसबरोबरच आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना यासारख्या भाजपाविरोधी पक्षांनी या प्रकरणावरुन योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!