Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate :महाराष्ट्राच्या नंतर आता वंचितची आता बिहारात मोर्चेबांधणी

Spread the love

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर . महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणारे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने  बिहार निवडणूक जिंकण्याचा संकल्प केलं आहे.  दरम्यान बिहार विधानसभा लढवत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी एमआयएमनं केली होती. त्यापाठोपाठ आज वंचित बहुजन आघाडीनंही बिहार निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. “बिहार विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्समध्ये (पीडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीत अन्य पक्षांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आघाडीच्या माध्यमातून एनडीएच्या अमानवी सरकार सत्तेवरून हटवून मानतावादी सरकार स्थापन करू,” असा विश्वास वंचित आघाडीनं व्यक्त केला आहे.

“बिहार विधानसभा निवडणूक जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष व प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्सचे समन्वय राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांच्यासोबत लढणार आहोत. यशवंत सिन्हा व काँग्रेसलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, मागच्या वेळेप्रमाणेच यावेळीही एनडीएचं सरकार दूर करू,” असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!