Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangrapeCase : पीडितेच्या गावाला घेरले आहे पोलिसांनी , पोलिसांना चकवा देऊन आलेल्या मुलाने दिली आहे “हि” धक्कादायक माहिती…

Spread the love

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीडितेच्या गावाला पोलिसांनी सर्व बाजूंना घेरले आहे. कोणालाही गावातून बाहेर जाण्याची आणि बाहेरून गावात येण्याची परवानगी नाही. मात्र, पोलिसांना चकवा देत लपून गावाबाहेर येत गावातील एका मुलाने पोलिस आणि प्रशानावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. पीडित कुटुंबाला प्रसारमाध्यमांशी बोलायचे आहे, मात्र त्यांना घरामध्येच कैद करून ठेवण्यात आले आहे. सर्वांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर माझ्या काकांच्या छातीवर जिल्हाधिकाऱ्याने लाथ देखील मारली, असे गंभीर आरोप या मुलाने केले आहेत.

पोलिसांची नजर चुकवून शेतातून पळत पळत आलेल्या या मुलाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. मला माझ्या कुटुंबीयांनी बाहेर पाठवले आहे. प्रसारमाध्यमांना इकडे घेऊन ये, आम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे असे त्यांनी मला सांगिल्याचे मुलाने सांगितले. कोणालाही घराबाहेर पडू दिले जात नसल्याचेही मुलगा म्हणाला. पोलिसांनी आमच्या घराला घेरले असल्याचे या मुलाने पत्रकारांना सांगितले. गाव, गल्ल्या आणि घरांमध्ये, तसेच घराबाहेर आणि घरांच्या छतांवर देखील पोलिस असल्याचे मुलाने सांगितले. कोणालाही बाहेर पडू दिले जात नाही. प्रसारमाध्यमांशी बोलण्याची बंदी घालण्यात आलेली आहे, अशी माहिती मुलाने दिली.

घरात असलेल्या सर्वांचे फोन हिसकावून घेण्यात आल्याची माहितीही या मुलाने दिली. आता कोणाकडेही फोन नाही. प्रत्येकाचे फोन काढून घेतल्यानंतर सर्वांना एका खोलीत बंद करण्यात आले आहे. सर्वजण घाबरलेले असून त्रस्त आहे मात्र त्यांचे कोणीही ऐकून घ्यायला तयार नाही, अशी तक्रारही मुलाने केली. ही माहिती देताना या मुलाने आणखी गंभीर आरोप केले. आमच्याकडे जिल्हाधिकारी आले होते. त्यांनी माझ्या काकांच्या छातीत लाथ मारली. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यांची तब्येत बरी नाही. मी लपून शेतांमधून येथपर्यंत आलो आहे. काका म्हणाले की पत्रकारांशी बोलायचे आहे, त्यांना बोलावून आण, अशी माहिती मुलाने दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!