AurangabadNewsUpdate : मांडूळ बाळगल्या प्रकरणी दोन अटकेत

औरंगाबाद – आज संध्याकाळी ६वा (गुरु १/१०)मांडूळ विक्रीसाठी नेत असतांना कलाग्राम समोर सिडको औद्योगिक पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी एंडोवर्ल्ड हाॅस्पिटलमधे चालक व सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. दरम्यान जप्त केलेले मांडूळ वनविभागाकडे सूर्पूर्द केले आहे.अशी माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
माणिक पांडुरंग भोसले(३६) रा.चिकलठाणा धंदा सुरक्षारक्षक व आदिनाथ बाबूराव काकडे(३०) रा. हर्सूल अशी अटक आरोपींची नावे आहेत.
आज दुपारी साडेतीन वा. नारेगाव ला मांडूळ जातीचा सर्प विक्री करण्यासाठी जात असल्याचे खबर्याने पोलिस निरीक्षक पोटे यांना सांगितले होते, त्यानुसार पीएसआय सुरेश जारवाल, मीरा लाड यांनी पथकासह कलाग्राम समोर सापळा लावला संध्याकाळी सहाच्या सुमारास वॅगनाॅर मधे वरील आरोपी गोणीमधे मांडूळ घेऊन जात असतांना पकडण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको औद्योगिक पोलिस तपास करंत आहेत.
बॅंक अधिकार्याचे घर फोडले,२लाख २७हजारांचा ऐवज लंपास,एक चोरटा अटक,५० हजारांचा मुद्देमाल जप्त
औरंगाबाद – गेल्या शनिवारी मध्यरात्रीनंतर मुकुंदवाडी भागातील तिरुपती काॅलनीत बॅंक अधिकार्याचे घर फोडणार्या चोरट्यांपैकी मुकुंदवाडी पोलिसांनी एक चोरटा अटक करंत त्याच्या ताब्यातून ५०हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशाल बबन पवार(३०) रा.तिरुपती काॅलनी मुकुंदवाडी यांचे २६सप्टेंबर रोजी चोरट्यांनी घर फोडून २लाख२७हजारांचा ऐवज चोरुन नेला होता. पवार यांची आई अत्यवस्थ असल्यामुळे तक्रार देण्यास त्यांना दोन दिवस उशीर झाला. तरीही पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल बांगर यांनी तपासाची चक्रे फिरवून एक चोरटा ५०हजारांच्या मुद्देमालासह अटक केला. त्याचा जोडीदार लवकर पकडला जावा म्हणून बावकर यांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव सांगणे टाळले. या प्रकरणी पुढील तपास पीएसआय राहुल बांगर करंत आहेत