Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ईडीची सख्त कारवाई : येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट जप्त

Spread the love

येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज सक्तवसुली संचनालयाने जप्त केला आहे. या फ्लॅटची किंमत १२७ कोटी आहे. लंडनमधील ७७ साऊथ ऑडली स्ट्रीटवर राणा कपूर याचे आलिशान अपार्टमेंट आहे. या प्रॉपर्टीचे मूल्य १३.५ मिलियन पाउंड असल्याचे सूत्रांनी म्हंटल आहे. कपूर याने २०१७ मध्ये ९३ कोटी रुपयांना ही अपार्टमेंट खरेदी केली होती. येस बँक घोटाळा प्रकरणात कपूरने अनेक कंपन्यांना नियमबाह्य कर्जे मंजूर केली आणि त्याबदल्यात त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्यांना जवळपास चार हजार ३०० कोटी रुपयांचा मोबदला मिळाला, असा आरोप आहे.

सीबीआयने येस बँक आणि दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) या प्रकरणात आता आरोपपत्र दाखल केले आहे. येस बँकेने दिलेल्या कर्जाऊ रक्कमेचा गैरवापर करतानाच डीएचएफएलने हे कर्ज बुडवले. याबद्दल येस बँकेचे संस्थापक राणा कपूर, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली व डीएचएफएलचे प्रवर्तक बंधू कपिल व धीरज वाधवान यांच्याविरुद्ध ह आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राणा कपूर व वाधवान बंधू सध्या सीबीआयच्या कोठडित आहेत. वाधवान यांना एप्रिल महिन्यात महाबळेश्वरहून ताब्यात घेण्यात आले होते. हे तिघेही सध्या तळोजाच्या कारागृहात आहेत.

उपलब्ध  माहितीनुसार, येस बँकेने डीएचएफएलच्या रोख्यांमध्ये ३७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याबदल्यात डीएचएफएलने डॉइट अर्बन या कंपनीला ६०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. डॉइट अर्बन ही कंपनी राणा कपूर यांच्या मुलींच्या नावे आहे. पुढे हे कर्ज बुडित खात्यात गेले. या प्रकरणात पैशांचा मोठा गैरव्यवहार झाल्याचा सीबीआयला संशय आहे. डॉइट अर्बनच्या नावे ४० कोटी रुपयांचे स्थावर मालमत्ता आहे. परंतु त्याचे बाजारी मूल्य ७५० कोटी रुपयांपर्यंत फुगवून दाखविण्यात आले. त्याआधारेच डॉइट अर्बनला कर्ज देण्यात आले. याखेरीज येस बँकेने वाधवान बंधूंच्या एका कंपनीला ७५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्याचाही तपास सीबीआयकडून सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!