Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मारहाण झालेल्या माजी नौदल अधिकाऱ्याची संरक्षण मंत्र्यांकडून चौकशी आणि दिला हा इशारा…

Spread the love

मुंबईत माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली आहे. राजनाथ सिंह यांनी मदन शर्मा यांना फोन केला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राजनाथसिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मुंबईत ८ ते १० शिवसेना कार्यकर्त्यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेची दखल आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली आहे. मारहाण झालेल्या माजी नौदल अधिकाऱ्याला राजनाथ सिंह यांनी फोन केला.  त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच सैन्यातील माजी अधिकाऱ्यावर झालेला हा हल्ला खेदजनक आहे. आणि असे हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाही’, असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलंय.

काल शुक्रवारी घडलेल्या या घटनेत मुंबईतील माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याच्या रागातून शिवसेना कार्यकार्त्यांनी ही मारहाण केली. या प्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नंतर त्यांना काही वेळाने जामिनावर सोडून देण्यात आलं.  दरम्यान मारहाण झालेल्या माजी नौदल अधिकाऱ्याच्या मुलीने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!