Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SSR Death Case : रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार , रियाच्या वकिलाची माहिती

Spread the love

बहुचर्चित सुशांत सिंह राजपूत मृत्यू  प्रकरणाला वेगळेच वळण लागत असून या निमित्ताने उघड झालेल्या ड्रग्स रॅकेट प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने  रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी धाड टाकत घराची झाडाझडती घेतली होती. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्सचा अॅंगल समोर आल्यानंतर हे कनेक्शन रिया चक्रवर्तीशी कुठेतरी जोडलेले आहेत का? हे तपासण्यासाठी आता रिया चक्रवर्ती वर अटक होण्याची नामुष्की आली आहे. दरम्यान रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार असल्याचे रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी म्हटले  आहे. आज (रविवारी) सकाळी रियाच्या घरी एनसीबी मुंबई पोलिसांसह दाखल झाली होती. यावेळी एनसीबीनं तिला समन्स बजावलं आणि स्वतःहून चौकशीसाठी येण्याचा किंवा आमच्यासोबत येण्याचा पर्याय तिच्यासमोर ठेवला. त्यानंतर रियाने स्वतःहून चौकशीसाठी हजर राहण्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. या पार्श्वभूमीवर रियाच्या वकिलांनी ही माहिती दिली.

या विषयी बोलताना रियाचे वकिल अॅड. मानेशिंदे म्हणाले, जर प्रेम करणं हा गुन्हा असेल तर ती याचे सर्व परिणाम भोगायला रिया तयार आहे. त्यामुळे ती अटकेसाठी तयार आहे. निरपराध असल्यानेच बिहार पोलिसांनी सीबीआय, ईडी आणि एनसीबीच्या मदतीने दाखल केलेल्या खोट्या केसेसविरोधात  रियाने कुठल्याही कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केलेला नाही.   रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीनं अटक करण्यात केली असून ९ सप्टेंबरपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे . त्यानंतर आज एनसीबीच्या टीमनं सकाळी रियाच्या घरी जाऊन रियाला समन्स बजावला असून रियाची चौकशी चालू आहे.

याशिवाय   ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास केला जात होता. याच तपासादरम्यान रिया आणि शौविकच्या मोबाईलची तपासणी केल्यावर ईडीला ड्रग्स संदर्भातले चॅट सापडले जे डिलीट करण्यात आले होते आणि हे चॅट सापडल्यानंतर या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एन्ट्री झाली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो डेप्युटी डायरेक्टर जैन यांनी आत्तापर्यंतच्या नार्कोटिक्स ब्युरोच्या कारवाईवर बोलत या प्रकरणांमध्ये अजून तपास करून रियाला आतापर्यंत चौकशीसाठी समन्स बजावले नाही आहे तसेच लवकरात लवकर तिला चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे, असं काल सांगितलं होतं.

रिया चक्रवर्तीवर ड्रग्सचं सेवन करणे, ड्रग्सची वाहतूक करणे आणि शौविकच्या माध्यमातून ड्रग्समागवणे असे आरोप आहेत . या प्रकरणामध्ये आतापर्यंत सात लोकांना अटक करण्यात आली आहे. यात अप्पा लखानी आणि करण अरोडा यांना जामीनही मिळाला आहे. तर जैद विलात्रा आणि बासित परिहार, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा यांना 9 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान शौविकच्या अटकेनंतर “अभिनंदन इंडिया… तुमच्यामुळे माझ्या मुलाला अटक झाली”, असा इंद्रजीत चक्रवर्ती यांचा मेसेज ट्विटरवर सध्या व्हायरल होत आहे. अनेकांना हा शेअर देखील केला आहे. त्याखाली इंद्रजीत चक्रवर्ती यांचं नाव देण्यात आले आहे. मात्र अद्याप या व्हायरल मेसेजवर इंद्रजीत चक्रवर्ती यांनी दुजोरा दिला नाही. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहले आहे कि , “अभिनंदन इंडिया… तुमच्यामुळे माझ्या मुलाला अटक झाली. मला खात्री आहे की, पुढचा नंबर माझ्या मुलीचा असेल. त्यानंतर माहित नाही पुढचा नंबर कोणाचा असेल. तुम्ही एक मध्यमवर्गीय कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे. मात्र न्याय मिळवण्यासाठी हे योग्य आहे.”  जय हिंद ! या संदेशाखाली लेफ्टनंट कर्नल इंद्रजीत चक्रवर्ती आणि कंसात निवृत्त असं लिहिलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!