Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SadNews : अरे रे … डीपीमधील रोहित्र फुटून उकळते तेल अंगावर पडल्याने आजी-नातीचा करुण अंत , आईही ८० टक्के भाजली… !!

Advertisements
Advertisements
Spread the love

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात रोहित्राचा ( डीपीचा ) भीषण स्फोट होऊन झालेल्या विचित्र अपघातात आजी आणि नातीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून  चार महिन्यांच्या चिमुकलीची आई गंभीररीत्या ८० टक्के भाजली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून रात्री उशिरा दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शारदा दिलीप कोतवाल (वय ५१) आणि शिवज्ञा सचिन काकडे (वय ४ महिने) असे मृत्यू झालेल्या आजी आणि नातीचे नाव आहे. तर चिमुकलीची आई अक्षदा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisements

याविषयीची अधिक माहिती अशी कि , भोसरी येथील इंद्रायणी नगरमध्ये बैठी पत्र्यांची घरे आहेत. या घरांजवळच वीजवाहक रोहित्र आहे. दरम्यान, शुक्रवारी या रोहित्रात बिघाड झाल्याने शनिवारी त्याजागी दुसरे रोहित्र बसवण्यात आले होते. परंतु, काही तासात त्याचा भीषण स्फोट झाला आणि या रोहित्राने पेट घेतला. या भीषण स्फोटात आजी आणि नातीला आपला जीव गमवावा लागला. शारदा कोतवाल या आपल्या नातीला शिवज्ञा काकडेला  दुपारच्या सुमारास अंघोळ घालत होत्या. त्यांच्या शेजारी चुमुकलीची आई अक्षदाही आजी नातीचे कौतुक पाहत बसली होती. तेवढ्यात, जवळच काही फुटांवर असलेल्या या रोहित्राचा भीषण स्फोट झाला आणि त्यातील उकळते  तेल चिमुकलीसह दोघींच्या अंगावर पडलं. यात आजी आणि नात या गंभीर भाजल्या त्यामुळे त्यांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!