Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्स प्रकरणात सुशांतच्या मदतनीसालाही अटक , आज होईल रियाची चौकशी

Spread the love

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीसह दोघांना अटक केल्यानंतर  या  प्रकरणात  सुशांतसिंह राजपूत याचा मदतनीस दिपेश सावंत यालाही  अटक केली आहे. यापूर्वी शुक्रवारी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीने अटक केली होती. दीपेश सावंत याला उद्या सकाळी ११ वाजता कोर्टा हजर करण्यात येईल. सुशांत प्रकरणात ड्रग्स मागवणं आणि हाताळण्याच्या त्याच्यावर आरोप आहे. नोंदवलेले गेलेले जबाब आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली. अटक केलेल्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार रिया चक्रवर्ती रविवारी एनसीबीसमोर हजर होईल. तर रिया आणि शौविक आणि दीपेश यांची समोरासमोर चौकशी केली जाईल, असं एनसीबीचे अधिकारी मुथा अशोक जैन यांनी सांगितलं. तर दुसरीकडे सीबीआयकडून सुशांतसिंहची बहिण मितू सिंहची पुन्हा चौकशी करण्यात आली. चौकशीत रियाचे ड्रग्स कनेक्शन आढळून आल्यास तिला अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे एनसीबीच्या कारवाईकडे संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष असेल.

दरम्यान सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीनंतर आता तिच्या आई- वडिलांचीही चौकशी केली जात आहे. सीबीआय व्यतिरिक्त नारकोटिक्स ब्युरोही या प्रकरणात ड्रग अँगलने चौकशी करत आहे. सीबीआय, ईडी आणि नारकोटिक्स या तिघांच्या चौकशीत नवीन गोष्टी समोर येत आहेत. समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, ड्रग्ज अँगलमध्ये त चार मोठी नावं यात सामिल असल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत प्रकरणात अमली पदार्थांच्या देवाण- घेवाणीत चार मोठी नावं गुंतलेली आहेत. यात मुंबईतील दोन नेते, एक टीव्ही अभिनेता आणि एक सिनेनिर्माता यांचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना या प्रकरणाचा तपास करत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!