AurangabadCoronaUpdate : औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि त्यांचे पती महापालिका प्रशासक दोघांनाही व्हावे लागले ‘क्वारंटाइन’

औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या पत्नी औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या बंगल्यातील पाच कर्मचाऱ्यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. हे दोन्हीही अधिकारी दुसऱ्यांदा ‘क्वारंटाइन’ झाले आहेत. दरम्यान या दोघांनीही आपली कोरोना टेस्ट केली असता त्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे. ‘क्वारंटाइन’ कालावधीनंतर पुन्हा पाच दिवसांनी त्यांना कोरोनाची टेस्ट करावी लागणार आहे. कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मोक्षदा पाटील यांच्या वाहनचालकाचा देखील समावेश आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी हि माहिती दिली आहे. दरम्यान यापूर्वीही त्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती तेंव्हाही या दोघाना ‘क्वारंटाइन’ व्हावे लागले होते आणि तेंव्हाही त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. आता पुन्हा त्यांच्या बंगल्यातील पाच कर्मचारी करोना बाधित झाले आहे. त्यात पाटील यांच्या वाहन चालकाशिवाय अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या तीन इतर नातेवाइकांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.