Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCricketUpdate : महेंद्रसिंग धोनी आणि फलंदाज सुरेश रैना यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय, चाहत्यांची मात्र नाराजी

Spread the love

अखेर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने  अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे .  गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज (15 ऑगस्टला) महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली.  मात्र आयपीएल खेळत राहणार असल्याची माहिती त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे  दिली आहे. दरम्यान महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ आता फलंदाज सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सुरेश रैनाने क्रिकेट मधून सन्यास घेतल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान त्यांच्या निर्णयावर चाहत्यांनी मात्र सोशल मीडियामधून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सुरेश रैनाने धोनी आणि टीम इंडियाच्या काही सहकाऱ्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे. माही, तुमच्या सोबत खेळणे शानदार राहिले. तुमच्या कारकिर्दीत खेळायला भेटले याचा अभिमान आहे, धन्यवाद भारत, जय हिंद, असे शब्द सुरेश रैनाने धोनीसाठी लिहले आहेत. सुरेश रैना आणि महेंद्र सिंह धोनी यांची मैत्रि जगजाहिर आहे. दोघेही अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स टिमकडून खेळत आहेत. दोघांनीही अनेकवेळा ऐकमेकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुरेश रैनाच्या आंतराष्ट्रीय क्रिकेट करियरमध्ये 18 टेस्ट मॅच, 226 वनडे सामने आणि 78 टी-20 इनटरनॅशनल मॅचमध्ये खेळला आहे. रैनाने एक शतक आणि सात अर्धशतकच्या जोरावर टेस्ट क्रिकेटमध्ये 768 रन बनवले आहेत. तर वनडेमध्ये रैनाने पाच शतक आणि 36 अर्धशतकी खेळ्या केल्या आहेत. यादरम्यान, 35 च्या सरासरीने 5615 रन काढले आहेत.

भारतीय संघाचा  एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्याने महेंद्रसिंग धोनीचे  योगदान नक्कीच मोठे आहे.  २००७ सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, २०११ सालचा वन डे विश्वचषक, २०१२ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीचे मोठे यश होते. क्रिकेट विश्वातील आपल्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत धोनीने ३५० वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात १० शतकं आणि ७३ अर्धशतकांसह १० हजार ७७३ धावा जमा आहेत. धोनीने  ९८ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये ३७.६० च्या सरासरीनं १६१७ धावा पटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल १२६.१३ आहे. या कामगिरीमुळे धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधीने सन्मानित करण्यात आले होते. पण २०१९ चा  विश्वचषक  न मिळाल्यामुळे क्रिकेट रसिकांच्या हे अधिक लक्षात राहिले आहे. धोनीने त्या विश्वचषकासाठी एकेका दहावीचा संघर्ष केला खरा पण यश आले नाही. 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!