AurangabadCrime : महिलेला कॉल करून छळणा-या मासे विक्रेत्याला केले जेरबंद

विवाहित महिलेला सतत कॉल करून अश्लिल बोलणा-या स्त्रीलंपट व्यक्तीला करमाड पोलिसांनी अटक केली आहे़. दिपक नाना गवळी (२५) धंदा मासेविक्रेता असे अटक आरोपीचे नाव आहे. सतत कॉल करून छळणा-या या विकृत व्यक्तीच्या तणावात ही महिला आत्महत्या करायला निघाली होती़ मात्र बहिणीने समजूत घालून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी समुपदेशन केल्याने महिलेचा जीव वाचला आहे़
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , करमाड हद्दीत राहणा-या एका महिलेला अनोळखी क्रमांकावरून सतत फोन येत होता़ कॉल करणारा व्यक्ती हा महिलेशी अश्लील बोलत असे. नव-याला सांगितले तर त्याला शंका येईल. म्हणून तीने आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला होता. पण बहिणीच्या सांगण्यावरून ती करमाड पोलिस ठाण्याला आली. तीने सदर प्रकार करमाड पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांना सांगितला. खेतमाळस यंनी गांभीर्य लक्षात घेऊन तक्रार नोंदवून घेतली़. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास सुरू केला. फोन करणा-या आरोपीचे लोकेशन शोधण्याचा काम सुरू केले. हे लोकेशन चाकण (जि. पुणे ) येथे असल्याने ग्रामीण पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांचे सूचनेनूसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले. अत्याधुनिक यंत्र सामुग्रीचा वापर करून २४ तासात महिलेला मानसिक त्रास देणा-या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. या व्यक्तीकडून गुन्हयात वापरण्यात आलेला मोबाईलही जप्त केला. ही कारवाई करमाड पोलिस ठाण्याचे निरिक्षक संतोष खेतमाळस, उपनिरिक्षक सुशांत सुतळे, कर्मचारी घडे, मोहतमल, टरमाले यांनी ही केली.