Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : जनावारे चोरणारी सराईतांची टोळी गजाआड

Spread the love

ग्रामीण भागातून जनावारे चोरणारी सराईतांची टोळी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली आहे़ ही कारवाई शुक्रवारी(दि़१७) रात्री साडे नऊच्या सुमारास करण्यात आली़ मलंग सत्तार कुरैशी( ३२, शेंदूरवादा, ताग़ंगापूर ) कदिर अब्दूल हमीद कुरैशी (४०, रा़शिल्लेखाना) आणि शेख इमरान शेख रफिक (२५, अमेरनगर, बीड बायपास) अशी आरोपींची नावे आहेत़.

ग्रामीण भागात जानावरे चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ १२ जुलै रोजी पेंडारपूर(ता़ गंगापूर) येथील शेतकरी सुरेश आसाराम लंगोटे यांच्या शेतातून दोन पांढ-या रंगाचे बैल व एक काळ्या रंगाची गाय चोरीला गेली होती़. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहचले़ सर्व माहिती घेतल्यानंतर पथकाने गंगापूर तालुक्यातील विश्वासू खब-यांना माहिती घेण्यास सांगीतले असता एका खब-याने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांना माहिती दिली की, शेंदूरवादा परिसरात राणाºया मलंग कुरैशी याने जनावरे चोरून नेली आहे़. या माहिती अधारे फुंदे यांनी तातडीने उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, संदीप सोळंके, गफार पठाण, विठ्ठल राख आदींच्या पथकाला खात्री करण्याचे सांगीतले़ तेव्हा मलंग याने जनावरे चोरल्याचे समोर आले़ त्याला ताब्यात घेताच त्याने ही चोरी अब्दूल हमीद कुरैशी, शेख इम्रान अन्य एका साथीदाराच्या मदतीने केल्याची कबूली दिली आहे़.

गंगापूरजहाॅंगिर ची चोरी झालेली मोटरसायकल चोरट्यांसहित सिडको पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद – अवघ्या पाच तासात गंगापूर जहाॅंगिर येथील चोरी झालेली मोटरसायकल विक्री करण्यास आलेल्या चोरट्यांसहित सिडको पोलिसांनी पकडली.या प्रकरणी चिकलठाणा पोलिसठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. अशी माहिती एपीआय महेश आंधळे यांनी दिली.
अविनाश गोकुळ पसरटे(२०) व आशिष कल्याण पाखरे (१९) दोघेही रा.वरुडकाजी अशी अटक आरोपींची नावे आहेत.वरील चोरटे मिसारवाडीत चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी आल्याची माहिती खबर्‍याने सिडको पोलिसांना देताच गस्तीवरील पीएसआय बाळासाहेब आहेर व पथकाने चोरटे मोटरसायकलसहित ताब्यात घेत चिकलठाणा पोलिसांच्या हवाली केले. वरील कारवाई पोलिसनिरिक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळासाहेब आहेर, पोलिस कर्मचारी राजेश बनकर, नरसिंगपवार , दिनेश बन यांनी पार पाडली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!