AurangabadNewsUpdate : सिटीबसच्या धडकेत एक ठार, बस चालकास अटक

औरंगाबाद – आज सकाळी (बुधवार) १०च्या सुमारास अदालत रोडवरील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर सिटी बसच्या धडकेत एक इसम ठार झाला या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे.
लक्ष्मण बाबूराव पाचे (४२) रा.गोलटगाव असे मयताचे नाव आहे.या प्रकरणी अटक केलेल्या बस चालकाचे नाव सय्यद अफसर सय्यद मेहमुद असे आहे. आज सकाळी १० च्या सुमारास लक्ष्मण पाचे अदालत रोडवर पायी चालतांना आरोपी बस चालवत होता. त्याच वेळी बसच्या धडकेने लक्ष्मण पाचे खाली कोसळले प्रत्यक्ष दर्शींनी पाचे यांना घाटी दवाखान्यात आणल्यानंतर तेथील डाॅक्टरांनी लक्ष्मण पाचेंना तपासुन मयत घोषित केले. या प्रकरणी मयताचे भाऊ गणेश पाचे यांच्या तक्रारीवरुन ड्रायव्हर सअफसरवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांतनगर पोलिस करंत आहेत.