Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate 4036 : जिल्ह्यात 2217 कोरोनामुक्त, 1601 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2217 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1601 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 200 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 112 आणि ग्रामीण भागातील 88 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 4036 कोरोनाबाधित आढळले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. कुतुबपुरा (1), नागसेन नगर (1), बंजारा कॉलनी (1), सराफा रोड (2), व्हीआयपी रोड, ज्युब्ली पार्क (1), पडेगाव (1), संभाजी कॉलनी, एन सहा (1), विद्या रेसिडेन्सी (1), जुना बाजार, नारायण नगर (1), पुंडलिक नगर (2), पद्मपुरा (1), इटखेडा (1), विष्णू नगर (1), सादात नगर (1), उल्का नगरी (1), संत तुकोबा नगर, एन दोन, सिडको (1), न्यू हनुमान नगर (1), लक्ष्मी नगर, गारखेडा (1), जयभीम नगर, टाऊन हॉल (1), हर्ष नगर (7), संजय नगर, बायजीपुरा (4), राज नगर (1), हर्सुल जेल (4), सिद्धेश्वर नगर, जाधववाडी (2), वसंत नगर, जाधववाडी (3), नागेश्वरवाडी (1), एकता नगर, चेतना नगर (1), जाधववाडी (1), क्रांती नगर (1), म्हसोबा नगर (2), पोलिस कॉलनी (1), एन नऊ हडको (1), एन अकरा (1), एन तेरा (1), राज हाईट (1), विनायक नगर, देवळाई (2), विशाल नगर (1), गरम पाणी (3), बुढीलेन (3), गारखेडा (5), हरिचरण नगर, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रोजा बाग (2), दिल्ली गेट (6), बेगमपुरा (1), नेहरू नगर (1), जामा मस्जिद परिसर (10), मयूर पार्क (1), समता नगर (1), सेव्हन राज हाईटस (2), शिवकृपा अपार्टमेंट (1), चिकलठाणा (3), समर्थ नगर (4), आनंद नगर (2), रेहमानिया कॉलनी (1), आरेफ कॉलनी (1), भोईवाडा (1), जुना बाजार (1), बालाजी नगर (2), न्यू पहाडसिंगपुरा (1), घाटी परिसर (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागातील रुग्ण

साई नगर, बजाज नगर (1), बजाज नगर, वाळूज (2), हिवरा (2), पळशी (1), मांडकी (4), कन्नड (1), पांढरी पिंपळगाव (1), दर्गा रोड, दारुसलाम पैठण (6), पडेगाव, गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (5), गंगापूर (2), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), जयसिंग नगर, गंगापूर (2), हाफिज नगर, सिल्लोड(2), बिलाल नगर, सिल्लोड (5), इंदिरा नगर, वैजापूर (1), पोलिस कॉलनी, वैजापूर (1) फुले नगर, पंढरपूर (1), दिग्वजिय हाऊसिंग सोसायटी (6), न्यू भाग्योदय हाऊसिंग सोसायटी (2), कंदील हॉटेल समोर बजाज नगर (4), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (3), बीएसएनएल गोडाऊन बजाज नगर (5), सिडको वाळूज महानगर (2), श्रीराम प्लाझा, सिडको वाळूज महानगर (1), सिडको कार्यालय परिसर (4), वडगाव (2), चिरंजीव सोसायटी, बजाज नगर (2), स्वेतशिल सोसायटी, बजाज नगर (1), गणपती मंदिर परिसर, बजाज नगर (1), संजिवनी सोसायटी, बजाज नगर (1), द्वारका नगरी, बजाज नगर (2), आनंद सोसायटी, बजाज नगर (1), लोकमान्य चौक, बजाज नगर (2), आकाश सोसायटी, बजाज नगर (1), गाडगेबाबा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (2), दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (2), बालेगाव, वैजापूर (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 78 स्त्री व 122 पुरुष आहेत.
आतापर्यंत 2217 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 2217 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. एकूण 81 कोरोनाबाधित रुग्णांना आज सुटी देण्यात आलेली आहे. या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत 25, उर्वरीत 56 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

घाटीत दहा, खासगी रुग्णालयात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील 23 जून रोजी पहाटे 3.30 वाजता चेलिपुरा पोलिस स्टेशन समोरील 70 वर्षीय स्त्री, सकाळी 7.30 वाजता चिकलठाणा परिसरातील हिना नगरातील 65 वर्षीय पुरूष, सकाळी 11.45 वाजता जुना मोंढा, भवानी नगरातील 65 वर्षीय पुरूष, रात्री 7.45 वाजता बारी कॉलनीतील 20 वर्षीय स्त्री, रात्री 9.15 वाजता मंजुरपुऱ्यातील 56 वर्षीय स्त्री, 24 जून रोजी पहाटे 12.30 वाजता बंजारा कॉलनीच्या संतोषी माता मंदिर परिसरातील 70 वर्षीय स्त्री, पहाटे 5.15 वाजता उस्मानपुऱ्यातील 82 वर्षीय पुरूष्, सकाळी सहा वाजता अजब नगरातील 60 वर्षीय्‍ स्त्री, सकाळी नऊ वाजता गंगापूर तालुक्यातील गजगावातील 80 वर्षीय स्त्री, औरंगाबाद शहरातील बारुदनगरनाला परिसरातील 60 वर्षीय स्त्री या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीमध्ये 164 कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 161 कोरोनाबाधित रुग्ण वास्तव्यास होते. तसेच शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये औरंगाबाद शहरातील जयसिंगपुरा भागातील 62 वर्षीय पुरूष, सिल्क मिल कॉलनीतील 62 वर्षीय पुरूष या दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 161, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 56, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 218 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!