Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबादकरांनी MHMH App चा लाभ घ्यावा : आस्तिककुमार पांडे

Spread the love

मनपा प्रशासक आणि आयुक्त  आस्तिक कुमार पांडये यांनी पोलीस मेस येथे सर्व 09 झोनचे पालक अधिकारी आणि कोविड निरीक्षक यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहर अभियंता एस.डी. पानझडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, कार्यकारी अभियंता  हेमंत कोल्हे, उप जिल्हाधिकारी श्रीमती एलिस पोरे, सहायक आयुक्त करणकुमार चव्हाण व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सदरील बैठकीत  पांडये यांना संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आता पर्यंत शहरातील एकूण 1,26,000 घरांचा सर्वेक्षण पूर्ण झाला असून यात 53,500 नागरिक 50 वर्षा पेक्षा जास्त वयोगटातील आढळून आले आहेत.

दरम्यान आज पावेतो एक लाख पेक्षा जास्त नागरिकांनी “माझी हेल्थ माझ्या हाती” (MHMH) हे  एप्लिकेशन “डाउनलोड”  केले आहे . काही 50 वर्षा पेक्षा जास्त वयोगटातील काही नागरिक अलगिकरण/विलगिकरण च्या भीतीने आपली वय लपवत आहे, अशी माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी समोर आणली. यावर  प्रशासक यांनी नागरिकांना आवाहन केले की नागरिकांनी जे शिक्षक किंवा कर्मचारी त्यांच्या घरी सर्वेक्षणासाठी येत आहे त्यांना खरी खरी माहिती द्यावी आणि आपल्या शरीरातले ताप आणि ऑक्सिजनची पातळी तपासून द्यावी. जर सर्वेक्षकला एखाद्या नागरिकाची ऑक्सिजनची पातळी कमी आढळून आली तर तो त्वरित संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना याची माहिती देईल आणि वेळेच्या आत वैदकीय मदत देणे शक्य होईल. याशिवाय MHMH App वर कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती खाटा उपलब्ध आहे ही माहिती देखील उपलब्ध असते. यामुळे नागरिक किंवा रुग्ण हॉस्पिटलची देखील निवड करू शकतात, श्री पांडेय म्हणाले. जास्तीत नागरिकांनी MHMH App डाउनलोड करून त्याचा लाभ घ्यावा यासाठी App बाबत पमफ्लॅट (माहिती पत्रक) उद्या पासून घरोघरी वाटप करण्याचे आदेश यावेळी मा आयुक्तांनी दिले.

याशिवाय सर्वेक्षणाचे कामासाठी जे शिक्षक अजूनही रुजू झाले नाहीयत त्यांना 24 तासाचा आत रुजू होण्याची नोटीस काढावी, या नंतर देखील जे रुजू होत नाही त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया करावी, असे आदेश देण्यात आले. काही कंटेन्मेंट झोन मधील नागरिक रस्ते बंद करण्यासाठी लावण्यात आलेले पत्रे उचकटून ये-जा करत आहेत या प्रकरणी मा प्रशासकांनी सक्त ताकीद केली आणि अश्या झोनमधील नागरिकांचे ये-जा वर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्देश दिले.
याशिवाय सिपला कंपनी यांनी मनपाला मेट्रोपोलिस लॅब मार्फत 10,000 कोविड चाचण्या मोफत करून देण्याचे आश्वासन दिले. मेट्रोपोलिस एक खाजगी लॅब असून चाचण्यांचा खर्च सिपला देणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!