AurangabadCrimeUpdate : गयब्या गॅंग जेरबंद ,१७ गुन्हे उघडकीस

लाॅकडाऊनच्या काळात पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोर्या ,२लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
औरंगाबाद – लाॅकडाऊनच्या काळात जवाहरनगर, उस्मानपुरा, वेदांतनगर,क्रांतीचौक आणि सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुमाकुळ घालत चोर्या करणार्या गयब्या गॅंगच्या दोघांना २लाख७० हजारांच्या ऐवजासहित उस्मानपुरा पोलिसांनी जेरबंद केले.
आकाश ऊर्फ गयब्या राजू खरे(१९) रा.मिलींदनगर व मनोज मनोहर साळवे(२०) रा.सातारा अशी अटक आरोपींची नावे आहेत.त्यांच्यासोबंत चार विधीसंघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.
लाॅकडाऊनच्या काळात दारु, कपडे,किराणा, औषधी,व मोबाईल शाॅपी फोडून वरील गॅंगने २लाख ७० हजारांचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला.या कारवाईत १७गुन्हे उघडकीस आणल्याचा दावा उस्मानपुरा पोलिसांनी केला आहे.
जप्त केलेल्या मुद्देमालात तीन मोटरसायकल, १६मोबाईल, एक कॅमेरा अशा महागड्या वस्तुंचा समावेश आहे.
वरील कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटीकरण शाखेच पीएसआय कल्याण शेळके पोलिस कर्मचारी प्रल्हाद ठोंबरे, सतीश जाधव,संतोष शिरसाठ, संजयसिंग डोभाळ यांनी पार पाडली.