Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#AurangabadCrimeCurrentUpdate : बहीण – भावाची निर्घृण हत्या करून एक किलो सोने लंपास

Spread the love

औरंगाबाद – एम.आय.टी. समोरील असलेल्या रो – हाऊस मधे बहीण भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आली असून घरातील एक किलो सोने लंपास झाले असल्याची  तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत सुरु होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे  आणि न्यायवैद्यक विभागाच्या पथकाने लगेच घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनाम्यानंतर पोलिसांनी या बहीण -भावाचे मृतदेह शव विच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवून दिले.


घटनास्थळी उपायुक्त डॉ . राहुल खाडे , गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डाॅ.नागनाथ कोडे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड  यांनी भेट दिली. आरोपींनी दरवाजा आतून उघडल्यानंतर प्रवेश केला त्या ठिकाणी चार चहा घेतल्याचे कप आढळले. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. माग काढता आला नाही. गुन्हेशाखेचे तीन आणि सातारा पोलिसांचे दोन पथके तपासा करता रवाना.हत्या झाली तेंव्हा परिसरातील लाईट अर्धातास गेली होती. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून रेल्वेपटरी परिसरातील सर्व परिसर पिंजून काढण्याचे काम सुरु आहे.खंदाडे यांचा शेतीचाही वाद होता असे सांगण्यात येत असून त्याचबरोबर त्यांच्या घरात एक किलो सोने आहे याची माहिती असणार्‍याकडूनच खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असून त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास चालू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरव लालचंद खंदाडे(१६) आणि किरण लालचंद खंदाडे (१९) अशी मयतांची नावे आहेत. मयताची आई संध्याकाळी सात च्या सुमारास जालन्याहून आल्या नंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पती लालचंद खंदाडे यांना फोन करुन कळवले.जालन्या जिल्ह्यातील पाचणवळगाव येथील खंदाडे कुटुंब रहिवासी आहे.लालचंद खंदाडे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. घटनास्थळी गुन्हेशाखेचे अजबसिंग जारवाल यांनी पथकासहित भेट दिली. लालचंद खंदाडे यांनी पोलिसांना जवाब दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला आहे.व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे .  सातारा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे अधिक तपास करंत आहेत.

बीड बायपास रोडवरील अल्पाइन हॉस्पिटलमगील सोसायटीत हि  धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तरुणीच्या डोक्यात जड वस्तू मारून तर तरुणाचा गळा चिरून हत्या केल्याने येथील संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सातारा परिसरात अल्पाइन हॉस्पिटलमागील  सोसायटीमधील बंगल्यात लालचंद पत्नी, दोन मुली व एका मुलासमवेत राहतात. त्यांची जालना जिल्ह्यात शेती आहे. आज सकाळी ते पत्नी व एका मुलीसमवेत शेतात गेले होते. त्यांची मुलगी किरण खंदाडे (वय १८) व मुलगा सौरव  खंदाडे (वय १६) हे दोघे घरी होते. मुलगी किरण पुणे येथे शिकते. मुलगा सौरभ पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीला आहे. दुपारी एक वाजून २२ मिनिटांनी त्यांचे आईबरोबर मोबाइलवर बोलणे झाले होते. रात्री आठच्या सुमारास लालचंद खंदाडे यांची पत्नी व मुलगी घरी परतले. त्यावेळी त्यांना खालच्या मजल्यावर बाथरूमजवळ किरण आणि सौरभ पडलेले होते. किरणच्या डोक्यात जड वस्तूने मारले होते व सौरभचा गळा चिरलेला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!