Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बंदी सचिन गायकवाड मृत्यूप्रकरणी चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती

Spread the love

औरंगाबाद :  न्यायाधीन बंदी सचिन भानुदास गायकवाड (रा. मु.पो.बहादरपूर, ता. कंधार, जि.नांदेड) यांच्या मृत्यू चौकशी होणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी उदय चौधरी यांनी औरंगाबाद उपविभागीय अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 प्रमाणे अधिकार राहतील. त्यांनी मृत्यूचे कारण, मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, दंडाधिकारी यांचा निर्णय, निष्कर्ष या मुद्द्यावर चौकशी करतील, असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

‘घाटी’स पीपीई कीट, पाच व्हेंटीलेटर, मल्टीपॅरामॉनिटर ‘स्कोडा’कडून भेट

कोविड- १९ या संसर्गजन्य आजाराने बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) संस्थेस १३८८ पीपीई किट, पाच व्हेटींलेटर, पाच मल्टीपॅरामॉनिटर स्कोडा कंपनी कडून देणगी स्वरूपात देण्यात आले.
यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, देणगी कक्षाचे समन्वयक अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड, ‘स्कोडा’चे उमा राव, डॉ.अभय कुलकर्णी, वेद जहागीरदार, प्रकाश तायडे, राजीव जोशी, नितिन कऱ्हाळे उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!