MumbaiNewsUpdate : “नवरी नटली ” फेम प्रसिद्ध लोकगायक छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन

राज्यातील प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं गुरुवारी निधन झालं. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. उपचार सुरू असतांनाच छगन चौगुले यांनी अखेरचा श्वास घेतला.
खंडेरायाच्या बानू लग्नाला नवरी नटली काल बाई सुपारी फुटली’ या गाण्याने छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली. याच बरोबर छगन चौगुले यांनी ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ यासारखे अनेक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाच्या सीडीज तर विशेष गाजल्या तर छगन चौगुले यांनी अनेकांच्या कुलदेवतांची गाणी आणि लोकगिते गायली आहेत.
गणेश चंदनशिवे यांची श्रद्धांजली
छगन चौगुले हे हाडाचे लोककलावंत होते. त्यांनी लोककलेचे विशेष असे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. तरीही त्यांची कला सादर करण्याची कौशल्य अफलातून होते. मुळातले ते जागरण गोंधळी होते. त्यामुळे त्यांची सुरुवात हे जारण गोंधळाच्या कार्यक्रमातून झाली. परंतु, केवळ जागरण गोंधळाचे कार्यक्रम न करता त्यांनी स्वत:तील कलेला व्याप्त स्वरुप दिले. त्यामुळे महाराष्ट्राने एक हाडाचा लोककलावंत गमाावला आहे, अशी भावना मुंबई विद्यापीठाचे लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदनशिवे यांनी एका वृत्तवाहिणीशी बोलताना व्यक्त केली आहे.