Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaEffect : का भडकल्या निर्मला सीतारामन राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर ?

Spread the love

गेल्या पाच दिवसांपासून देशाच्या अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० लाख कोटीच्या विशेष पॅकेजची माहिती देत आहेत आज त्यांनी नेहमी प्रमाणे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हि माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अक्षरशः सोनिया गांधींना हात जोडले.  प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी थेट काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. त्या म्हणाल्या की मी विरोधकांना सांगू इच्छिते की मजुरांच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र आले पाहिजे. याप्रकरणी आम्ही राज्यांबरोबर एकत्र येऊन काम करत आहोत. मी हात जोडून सोनिया गांधी यांना सांगू इच्छिते की, आपल्याला या प्रवाशांबरोबर अधिक जबाबदारीने बातचीत केली पाहिजे. त्यांनी असा सवाल केला काँग्रेसशासित राज्या प्रवाशांना राज्यात आणण्यासाठी का जास्त ट्रेन्सची मागणी करत नाहीत?

पत्रकारांशी बोलताना सीतारामन म्हणाल्या की केंद्र सरकारने मजुरांना आहात तिथे राहण्याची विनंती केली होती. त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जात आहे. त्या म्हणाल्या की मात्र त्यांना घरी जायचे असल्याने केंद्राने रेल्वेची व्यवस्था केली. रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ट्रेन्स तयार आहेत. राज्यांकडून जितकी मागणी होईल तितक्या ट्रेन पाठवण्यात येतील, असं वक्तव्य अर्थमंत्र्यांनी केलं आहे. सीतारामन म्हणाल्या की केंद्र सरकार मजुरांच्या प्रश्नावरून जास्त गंभीर आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. राहुल गांधी यांनी शनिवारी रस्त्यावर उतरत मजुरांची बातचीत केली होती. त्यावरून अर्थमंत्र्यांनी राहुल यांना लक्ष्य केले.

दरम्यान देशामध्ये कोरोना व्हायरस मुळे सर्वकाही ठप्प, रहदारी बंद आहे. अशावेळी काहीच पर्याय नसल्यामुळे अनेक मजूर देशातील विविध शहरांमधून आपापल्या गावी परतत आहेत. प्रवासी मजुरांनी अशाप्रकारे पायी चालत जाणं आज देशातील एक मोठी समस्या बनली आहे. दरम्यान या मुद्दयावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीक केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पाचवा टप्पा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी जाहीर केला. मात्र यावेळी पत्रकार परिषदेमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की पीडीएस आणि मनरेगा अंतर्गत मजुरांसाठी घोषणा करण्यात आल्या आहेत, पण त्याचा लाभ त्यांना त्यांच्या गावी पोहोचल्यावर घेता येणार आहे. पण अनेक मजून अजूनही रस्त्यामध्ये आहेत, त्यांचं काय? या प्रश्वाचे उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन काहीशा आक्रमक झालेल्या दिसल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!