#CoronaVirusUpdate : औरंगाबाद शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६८४ तर दिवसभरात तिसरा बळी…

औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज ६८४ वर गेली असून बुधवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ३१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. सकाळी २४ तर दुपारी आणखी ७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये जय भवानी नगर १, सिल्कमिल कॉलनी १, सातारा परिसर १, कैलास नगर १ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबधितांचा आकडा ६८४ वर जाऊन पोहोचला आहे.
दिवसभरात तिघांचा मृत्यू
घाटी प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार, सकाळी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला यामध्ये ५८ वर्षीय कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह स्त्री रा. हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर आणि ९४ वर्षीय कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह स्त्री रुग्ण रा.अरुणोदय कॉलनी, बीड बायपास या रुग्णांचा समावेश आहे. दुपारी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्या ६५ वर्षीय कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह महिला रा. सिल्क मिल्क कॉलनी, औरंगाबाद यांना खाजगी रुग्णालयातुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद येथे दि.१२ मे रोजी संदर्भात करण्यात आले होते, परंतू आज दि.१३ मे रोजी सकाळी ४.०० वाजता त्यांचा बायलॅट्रल न्युमोनिया डयुटु कोव्हिड -१९ इन केस ऑफ डायबिटीज मेलिटस विथ हाइपरटेंशन विथ इसकेमीक हार्ट डिसीज या कारणामुळे दुदैवी मृत्यु झाला. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची संख्या आता १८ झाली आहे.
सकाळी २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
रामनगर 1, संजयनगर 2, नवयुग कॉलनी भावसिंगपुरा 1, आरटीओ ऑफिस पदमपुरा 1, भुजबळनगर नंदनवन कॉलनी 1, वृंदावन कॉलनी 1 व रविकिरण कॉलनी नंदनवन कॉलनी 1, गंगाबावडी नंदनवन कॉलनी 2, पुंडलिकनगर गल्ली क्रमांक दोन 2, हुसेनकॉलनी 2, गल्ली नं 1 गांधी नगर रविवार बाजार 1, जय भवानी नगर 1, विजय नगर गारखेडा 1, मनपा हॉस्पिटल बाजूला सातारा परिसर 1, एन आठ चैतन्य हौसिंग सोसायटी 1, राहमानिया कॉलनी 1, हुसेन कॉलनी गारखेडा 1, घाटी कॅम्पस 1, भडकल गेट 1, अरुणोदय कॉलनी 1 अशा 24 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत