Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 687 कोरोनाबाधित, 210 कोरोनामुक्त, चार रुग्णांचा मृत्यू

Spread the love

शहरात 34 रुग्णांची वाढ, आठ जणांना मिळाला डिस्चार्ज

 औरंगाबाद शहरातील विविध भागातील 34 कोविडबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 687 झाली आहे. नव्याने भर पडलेल्यांमध्ये 20 पुरूष आणि 14 महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) आज सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये औरंगाबाद शहराच्या संजय नगरातील चार, किल्लेअर्क आणि नूर कॉलनीतील प्रत्येकी एक असे एकूण सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये चार महिला आणि दोन पुरूष आहेत. तर दोन घाटीतील रुग्णांनाही डिस्चार्ज मिळाल्याने एकूण आठ कोरोनाबाधित रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याचे मिनी घाटी प्रशासनाने कळविले आहे.

आतापर्यंत 70 जण मिनी घाटीतून, घाटीतून तीन, मनपाच्या कोविड केअर केंद्रातून 132, खासगी रुग्णालयातून पाच असे एकूण 210 जण बरे होऊन घरी गेले आहेत. मिनी घाटीत आज 42 स्वॅब घेतले असून ते घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील 14 आणि अन्य दोन असे एकूण 16 अहवाल येणे बाकी आहेत.
नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबाद शहरातील राम नगर (01), संजय नगर (02), नवयुग कॉलनी, भावसिंग पुरा (01), आरटीओ ऑफिस जवळ, पद्मपुरा (01), भुजबळ नगर, नंदनवन कॉलनी (01), वृंदावन कॉलनी, नंदनवन कॉलनी (01), नंदनवन कॉलनी (01), गगनबावडी, नंदनवन कॉलनी (02), पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक दोन (02), गांधी नगर, गल्ली क्रमांक एक (01), जयभवानी नगर (05), विजय नगर, गारखेडा परिसर (01), सातारा परिसर (02), एन आठ (01), रहेमानिया कॉलनी, गल्ली नं. चार (02), हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर (03), घाटी परिसर (01), भडकल गेट (01), अरुणोदय कॉलनी (01), सिल्क मिल कॉलनी (01), कैलास नगर (01), सिल्लेखाना (01), शहा बाजार (01) या परिसरातील आहेत.

खासगी रुग्णालयात कोविडबाधिताचा मृत्यू

रहेमानिया कॉलनीतील 59 वर्षीय पुरूष कोविडबाधित रुग्णाचा एका खासगी रुग्णालयात आज मृत्यू झाला. तसेच घाटीत मागील चोविस तासात तीन महिला रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत 19 कोविडबाधितांचा मृत्यू झाला असल्याचेही मिनी घाटी प्रशासनाने सांगितले.

घाटीत 56 रुग्णांवर उपचार सुरू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे आज दुपारी चार वाजेपर्यंत घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात 56 (कोरोना) कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 49 रुग्णांची स्थिती सामान्य आहे. सात रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तर दोन पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना आज सुटी देण्यात आली आहे. या रुग्णांमध्ये समता नगरातील 51 वर्षीय पुरूष आणि असेफिया कॉलनीतील 38 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. तसेच 38 कोविड निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले आहे.
तर घाटीमध्ये एकूण 54 रुग्णांची स्क्रीनिंग करण्यात आली. त्यापैकी 20 रुग्णांचा स्वॅब घेण्यात आला असून पाच रुग्णांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे. मागील एका रुग्णासह एकूण 16 रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे. घाटीत एकूण 110 रुग्ण भरती आहेत.
रहेमानियाँ कॉलनीतील 29 वर्षीय महिला, संजय नगरातील 56 वर्षीय पुरूष, घाटी परिसरातील 61 वर्षीय पुरूष, हुसेन कॉलनीतील 55 वर्षीय महिला, भडकल गेट येथील 49 वर्षीय पुरूष यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

तीन कोविडबाधित महिलांचा घाटीत मृत्यू

गारखेडा परिसरातील हुसेन कॉलनी येथील 58 वर्षीय, बीड बायपास रोडवरील 94 वर्षीय या कोविड बाधित महिलांचा काल (दि.12 मे रोजी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयातून 12 मे रोजी सिल्क मिल येथील 65 वर्षीय महिलेस घाटीत संदर्भीत केले होते. परंतु आज 13 मे रोजी सकाळी चार वाजता त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे डॉ. येळीकर व डॉ गायकवाड यांनी कळवले आहे.

हुसेन कॉलनी येथील रुग्णास 12 मे रोजी सकाळी 10.17 वाजता कोविड संशयित म्हणून घाटीच्या अतिदक्षता विभागात गंभीर अवस्थेत भरती केले होते. ताप, खोकला, दम लागणे आदी लक्षणे त्यांना आढळून आली होती. सोबतच त्यांना मधुमेह व हायपोथयॅराडिझम हा आजार होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, 12 मे रोजी दुपारी 12.20 वा. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता व त्यांचा कोविड अहवाल रात्री 10.30 वाजता पॉझिटिव्ह आला. तर बीड बायपास रोडवरील महिलेसही घाटीत काल (12 मे रोजी) दुपारी 4.45 वा. अतिदक्षता विभागात अतिगंभीर अवस्थेत भरती केले होते. भूक न लागणे, अशक्तपणा असल्याने त्यांना बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांचाही उपचारादरम्यान 12 मे रोजी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला. मृत्यू पश्चात त्यांचाही स्वॅब घेण्यात आला. रात्री 10.30 च्या दरम्यान त्यांचा कोविड पॉझटिव्ह अहवाल प्राप्त झाला. तर सिल्क मिल कॉलनीतील महिला रुग्णास न्युमोनिया, मधुमेह, हृदय् विकार आदी आजारही होते, असेही डॉ. येळीकर व डॉ. गायकवाड यांनी कळवले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!