#CoronaVirusEffect : 74 स्थलांतरित मजूर स्मार्ट सिटी बस ने स्वगृही रवाना …

शासन आदेशानुसार जी व्यक्ती ज्या ठिकाणी राहत असेल ती व्यक्ती त्याच ठिकाणी राहणे आवश्यक आहे .त्यानुसार महानगरपालिका औरंगाबाद यांच्या वतीने शहरातील कंटेनमेंट झोन विरहित मनपा के .प्रा .शा सिडको एन 7 येथील शाळेत 60 स्थलांतरित मजूर,एन 6 सिडको येथील शाळेत 57,ज्यूबली पार्क येथील शाळेत 15,जवाहर कॉलनी येथील शाळेत 27 अशा एकूण 159 स्थलांतरित मजुरांची दिनांक 31 मार्च 2020 पासून महानगरपालिके तर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे व त्यांना याबाबतचे आरोग्य प्रमाणपत्र देण्यात आले आहे .
मा.अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार राज्यातील विविध ठिकाणच्या 71 स्थलांतरित मजूर व औरंगाबाद शहरातील 3 असे एकूण 74 स्थलांतरित मजुरांना आज दि 9 मे 2020 रोजी मा.मनपा आयुक्त तथा मनपा प्रशासक श्री आस्तिक कुमार पांडेय यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या 3 स्मार्ट सिटी बस मधून स्वगृही पाठविण्यात आले.यात जालना 5,बुलढाणा 5,अकोला 6,वाशीम 13 ,भोकरदन 19 ,व जळगाव 23 असे एकूण 74 स्थलांतरित मजूर 3 स्मार्ट सिटी बस मधून स्वगृही रवाना झाले आहेत.
यावेळी शहर अभियंता श्री एस डी पानझडे,सहायक आयुक्त श्रीमती विजया घाडगे,व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मा.आयुक्तांनी बस मधील मजुरांशी संवाद साधला.तिन्ही बस मधील मजुरांना मास्क देऊन सोशल डिस्टनसिंग द्वारे बस मधून पाठविण्यात आले .