#AurangabadNewsUpdate : १२०० मजुरांना घेऊन विशेष रेल्वे आज औरंगाबादहून भोपाळकडे रवाना….

लॉकडाउनमुळें औरंगाबाद विभागात वेगवेगळ्या निवारागृहात असलेले परराज्यातील 1200 मजुरांना घेऊन आज औरंगाबाद ते भोपाळ विशेष रेल्वे आज रात्रौ 8 वाजता रवाना झाली. श्रमिक स्पेशल रेल्वे मध्ये औरंगाबाद, नांदेड, बीड,उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध निवारागृहातील 1200 मजुरांचा समावेश आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाकडून या प्रवासासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंग पालन करून चोख व्यवस्था केली होती.या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्ण पणे सॅनिटाईज करण्यात आली असुन प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात येत होती तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती . तसेच सोबत खाद्यपदार्थ ही देण्यात आले होते.