#AurangabadNewsUpdate : शहरात सोशल डिस्टन्सींगचा उडाला फज्जा, बाजारपेठेत नागरीकांची तुफान गर्दी

औरंंंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी ऑड-इव्हन चा फार्मुला वापरण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी (दि.४) इव्हन डे असल्यामुळे बाजार पेठेतील जिवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडल्यावर शहरात सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसून आले. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरीकांनी बाजारपेठेत तुफान गर्दी केल्याने अनेक ठिकाणी वाहतूकीचा खोळंबा झाला असल्याचे चित्र दिसून आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या २५ मार्चपासून औरंगाबाद शहरात संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या पहील्या आणि दुसNया टप्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने उघडण्यास शासनाने प्रतिबंध केला होता. सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. लॉकडाऊनच्या तिसNया टप्यात बाजारपेठेत होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी ऑड-इव्हन हा फार्मुला वापरत सम तारखांना जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत उघडण्यास परवानगी दिली आहे. तर विषम तारखांना दवाखाने, मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी इव्हन डे (सम तारीख) असल्यामुळे सकाळी ७ ते ११ या वेळेत उघडण्यात आली होती. बाजारपेठेतील भाजीपाला, किराणा मालाची व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडल्यावर खरेदीसाठी शहरवासीयांनी बाजारात गर्दी केली होती. बाजारपेठेत झालेल्या गर्दीला आवरतांना पोलिस देखील हतबल झाले असल्याचे चित्र दिसून आले. शहरातील शहागंज, टीव्ही सेंटर, औरंगपुरा, जुना मोंढा, जाधववाडी येथील नवीन मोंढा, हडको-सिडको आदी भागात असलेल्या बाजारपेठेत सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला होता.
पोलिसांनी केली ११ वाजता दुकाने बंद
सोमवारी सकाळी ११ वाजेनंतर पोलिसांनी शहराच्या बाजारपेठेतील गर्दी कमी करीत व्यापाNयांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यावेळी पोलिस आणि काही नागरीकांत शाब्दीक चकमक देखील काही ठिकाणी पहायला मिळाली.