Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 297 कोरोनाबाधित, आज 15 रुग्णांची वाढ, कोरोनाबाधितांमध्ये 56 टक्के पुरूष, 44 टक्के महिला

Spread the love

55 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू

औरंगाबाद  : औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 15 कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 297 झाले आहेत. कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) किलेअर्क (2), सावित्री नगर, चिकलठाणा (1), देवळाई (1), पुंडलिक नगर (2), नंदनवन कॉलनी (1), जय भीमनगर (3), संजय नगर (4), एन-11 हडको (1) या परिसरातील आहेत, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले.
कोरोनाबाधित 297 रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण 21 ते 30 वयोगटातील 66 कोरोनाबाधित आहेत. त्यापाठोपाठ 31 ते 40 वयोगटातील 64 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. सर्वात जास्त वय असलेल्या 80 वर्षावरील एका रुग्णाचा समावेश आहे. वय वर्षे एक ते 10 वयोगटातील 24 रुग्ण आहेत. 11 ते 20 वयोगटातील 52, 41 ते 50 वयोगटातील 35, 51 ते 60 वयोगटातील 26, 61 ते 70 वयोगटातील 21, 71 ते 80 वयोगटातील आठ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. यामध्ये 166 पुरूष रुग्ण, 131 महिला रुग्ण आहेत. तर दहा मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वयामध्ये 41 ते 50 वयोगटातील एका रुग्णाचा समावेश आहे. 51 ते 60 वर्षातील चार रुग्ण, 61 ते 70 वयोगटातील तीन रुग्ण, 71 ते 80 वयोगटातील दोन रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये पुरूष 56 टक्के तर महिला 44 टक्के असल्याचेही कळवले आहे.
मिनी घाटीत आज 19 जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह, पाच रुग्णांचे निगेटीव्ह आले आहेत. 12 अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर सध्या मिनी घाटीमध्ये 124 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही कळविण्यात आलेले आहे.

घाटीत 19 कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) कोविड डेडिकेटेड रुग्णालयात एकूण 19 कोविड (कोरोना) रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 16 रुग्णांची प्रकृती सामान्य आहे. तीन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तर घाटीतून 11 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना किलेअर्क येथील कोविड केअर सेंटर येथे संदर्भीत केले आहे. सध्या घाटीत 37 कोविड निगेटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन कोविड रुग्ण बरे झाल्याने त्यांना उपचारांती सुटी दिली आहे. घाटीत उपचार घेत असलेल्या सिटी चौकातील 65 वर्षीय पुरूष रुग्ण, टीव्ही सेंटर येथील 27 वर्षीय स्त्री रुग्ण यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला आहे. याशिवाय मनपा हद्दीतील चार जणांचाही कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 297 झाल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळविले आहे.
घाटीत आज दुपारी चार वाजेपर्यंत 40 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 15 रुग्णांचा स्वॅब घेण्यात आला. दोन रुग्णांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. 13 रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे. एकूण 69 रुग्ण घाटीत भरती आहेत. तसेच औरंगाबाद शहरातील बीड बायपास रोडवरील देवळाई परिसरातील कोविड (कोरोना) बाधित 55 वर्षीय पुरूष रुग्णाचा रविवार, 3 मे रोजी रात्री 11 वाजता उपचारादरम्यान न्युमोनिआ, कोविड, श्वसनविकाराने मृत्यू झाला. त्यांना दोन्ही फुफ्फुसांचा न्यूमोनिआ, मधुमेहाचा आजार होता. आतापर्यंत 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचेही डॉ. येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे.

Update 7.30 PM

आपलं सरकार

Click to listen highlighted text!