Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : औरंगाबाद २७४ , महाराष्ट्र १२ हजाराच्या वर तर देशात ४० हजार !!

Spread the love

मुंबई , पुणे पाठोपाठ औरंगाबाद शहरातील कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून  काल रात्रीपासून (2 मे) सकाळपर्यंत एकूण 30 कोविड रुग्णांची वाढ झाली. काल रात्री उशीरा (कंसात रुग्ण संख्या) नंदनवन कॉलनी (1), जयभीम नगर (12) अशा एकूण 13 रुग्णांची वाढ झाल्याने 257 कोविड रुग्ण 2 मेपर्यंत आढळले. तर आज सकाळी इंदिरा नगर, बायजीपुरा (1), मुकुंदवाडी (16) येथील एकूण 17 रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 274 कोविड रुग्ण आढळल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

>> महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 11 हजार 500हून अधिक आहे. त्यामध्ये मुंबईसह उपनगर, पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशभरात मृतांचा आकडा 1 हजार 152 वर पोहोचला आहे. तर

>> नांदेड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आज वाढून 26 झाली असली तरी नागरिकांनी भयभीत होऊ नये. परिस्थिती नियंत्रणात असून, सर्वांनी अधिक खबरदारी व सोशल डिस्टन्सिंग बाळगून शासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असंही चव्हाण म्हणाले.

>> महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन वाढवण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे.

>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पाच वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे.   सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणार आहे.

>> महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरत आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात 52 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

>> महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा उद्यापासून उठणार आहे. त्यामुळे राज्यातील रेड झोन असलेल्या पुण्यात काही बदल होणार आहे. परंतु, संचारबंदी शिथिल होणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

>> पुणे जिल्ह्यात शनिवारी 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना बळीचा आकडा 103 वर पोहोचला आहे. शनिवारी  दिवसभरात 97 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने  जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1912 वर पोहोचला आहे.

>> पुणे जिल्हा हा रेड झोनमध्ये असल्याने आणि शहरात अनेक ठिकाणे हॉटस्पॉट असल्याने पुण्यात आधीचेच निर्बंध कायम राहणार आहेत. शहराच्या सीमा सील राहणार आहे. फक्त पुणे शहर अथवा जिल्ह्यातून मजुरांना परराज्यात जाता येईल. मात्र, पुण्यातून राज्यातील अन्य शहरात किंवा गावात जाता येणार नाही.

>> आत्तापर्यंत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसंच विविध तहसीलदार कार्यालय यांच्याकडे परराज्यात-परगावी जाण्यासाठी साडेपाच हजार अर्ज आले आहेत. परराज्यात जाणाऱ्या मजुरांना केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, त्यांच्या गावी सोडण्यात येणार आहे.

>> पुणे शहर आणि ग्रामीण भागात कंटेन्मेंट झोन अर्थात अतिसंक्रमणशील (सील केलेला भाग ) सोडून इतर ठिकाणी फिजीकल डिस्टसिंग पाळून बांधकाम क्षेत्रातील कामे सुरू करता येतील, असं जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे.

>> रेड झोनमध्ये सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, टॅक्सी, टॅक्सी  APP सेवा, आंतर जिल्हा आणि जिल्ह्य़ांतर्गत बससेवा, केशकर्तनालय, स्पा, सलून या सेवांवर बंदी

>> बिगर जीवनावश्यक सेवा फक्त सकाळी 7 ते संध्या 7 सुरू राहील. गरज भासल्यास जमावबंदी लागू.

>> सर्व श्रेणींमध्ये 65 वर्षांहून अधिक वयोगटातील मधुमेह वगैरे गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुलांनी घरातच राहणे गरजेचे.

>> तीनही श्रेणीत बाह्य़रुग्ण विभाग सुरू राहतील. पण, नियंत्रित विभागात मात्र मुभा नाही.

>> वाइन शॉप्स, पानाची दुकानं फक्त ग्रीन झोनमध्येच उघडली जाणार

>> खरेदी करताना ग्राहकांनी सहा फुटांचं अंतर राखणं आवश्यक

>> एकावेळी शॉपमध्ये पाचपेक्षा जास्त लोक नकोत

>> महाराष्ट्रातले  उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा हे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!