Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या काळात दारूसंबंधी केंद्र सरकारने घेतला हा निर्णय…

Advertisements
Advertisements
Spread the love

देशात आणि राज्यात उद्या दि ४ मे पासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होत असून  या तिसऱ्या टप्प्यामध्ये रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन या तिन्ही झोनमध्ये दारूची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र ज्याठिकाणी फक्त दारू दुकान आहे, अशा दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मॉल्समध्ये दारूची दुकानं उघडण्यास परवानगी नाही आहे. या सर्व परिस्थितीमध्ये सर्वच स्तरातून दारूची ऑनलाइन डिलिव्हरी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे, जेणेकरून दारू दुकानांमध्ये गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे देखील पालन होईल.

Advertisements

कोरोनाच्या या संकटकाळात दारूविक्रीतून मिळणारं उत्पन्न राज्य सरकारांसाठी महत्त्वाचे आहे. या संकटात राज्याचा महसूल अधिक खर्च होत आहे मात्र उत्पन्न कमी झाले आहे. गेल्या वर्षी दारूविक्रीतून देशातील राज्य सरकारांना 2.84 लाख कोटींचा महसूल मिळाला होता.

Advertisements
Advertisements

ISWAI (The International Spirits and Wines Association of India ) चे चेअरमन अमृत किरण सिंह यांनी हिंदुस्तान टाइम्स ला दिलेल्या माहितीनुसार नवीन नियम लागू झाल्यानंतर दुकानांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे योग्य पालन करण्यात येईल. आम्ही सेफ शील्डची सुरूवात करू. म्हणजेच काउंटवर ट्रे ठेवण्यात येऊन संपर्करहित विक्री केली जाईल. त्यांनी पुढे सांगितलं की सेफ शील्डच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दारूच्या होम  डिलिव्हरीबाबत चर्चा केली जाईल. याकरता स्विगी किंवा झोमॅटोसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सची मदत घेतली जाईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!