सोशल डिस्टसिंगचे पालन करून प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार , व्हिडीओ कॉलवरूनच मुलगी रिद्धिमाने घेतले अंत्यदर्शन….

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा रणबीर कपूर यांनी सर्व विधी पार पाडले. यावेळी कपूर कुटुंबियांसह काही जवळचे मित्र स्मशानभूमीत उपस्थित होते. बुधवारी मध्यरात्री मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने दाखल केले होते. मात्र ३० एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलीवूडसह त्यांचे चाहते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कोरोना व्हायरसमुळे शहरात सुरु असलेली लॉकडाऊनमुळे अनेकांना बाहेर पडत आले नाही .
पोलिसांनी केवळ १५ ते २० लोकांना अंत्यसंस्काराच्या वेळी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. यावेळी मुलगा रणबीर कपूर, पत्नी नीतू यांच्यासह कुटुंबातील २४ माणसं उपस्थित होती. ऋषी यांची मुलगी रिद्धिमा दिल्लीला आहे. गृहमंत्रालयाने तिला मुंबईला जाण्याची परवानगी दिली खरी पण तिने डीजीसीएकडे चार्टर प्लेनची परवानगी मागितली होती. त्यासाठी तिला नकार देण्यात आला. त्यामुळे रिद्धिमा आता बाय रोड १४०० किमीचा प्रवास करून मुंबईत येणार आहे. यामुळे ती वडिलांच्या अंत्यसंस्काराला येऊ शकली नाही. आपल्या पित्यावर तिने अत्यन्त भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
https://www.instagram.com/p/B_mQ6kNnTBO/
नीतू आणि रणबीर कपूर यांच्याशिवाय रणधीर कपूर, करीना कपूर, सैफ अली खान , अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अनिल अंबानी, आलिया भट्ट, रीमा जैन, मनोज जैन, आदर जैन, अनीशा जैन, विमल पारीख, डॉ. टंडन आणि राहुल रवैल हे अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. ऋषी यांचं निधन हे संपूर्ण कपूर कुटुंबियांसाठी कधीही न भरून येणारं नुकसान आहे. यातही नीतू कपूर, रणबीर आणि रिद्धिमा यांच्यासाठी हा सर्वात कठीण काळ आहे.
दरम्यान ऋषी कपूर यांच्या निधनानंतर पत्नी नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी लिहिले की, ‘दोन वर्ष ल्यूकेमिया आजाराशी लढल्यानंतर सर्वांचे लाडके ऋषी यांचं आज ८ वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं. इस्पितळातील डॉक्टरांनी आणि मेडिकल स्टाफने सांगितलं की शेवटपर्यंत ऋषी यांनी त्यांचं मनोरंजन केलं.’ कुटुंब, मित्र, जेवण आणि सिनेमा या गोष्टींवरच त्यांचं अधिक लक्ष असायचं. या काळात कोणीही त्यांना भेटायचं तेव्हा ऋषी यांचा उत्साह पाहून अवाक् व्हायचं. आजाराला त्यांनी कधीच स्वतःवर वरचढ होऊ दिलं नाही. ऋषी यांना डोळ्यात अश्रू आणून नाही तर हसऱ्या चेहऱ्याने लक्षात ठेवावं अशी त्यांची इच्छा होती. ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांकडून जारी करण्यात आलेल्या पत्रातही लोकांना या कायदे- नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आले होते.
https://www.instagram.com/p/B_mLxi4gT2B/
दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये ऋषी यांना कर्करोग असल्याचं कळलं होतं. यानंतर उपचारांसाठी ते अमेरिकेत गेले होते. ११ महिने ११ दिवसांच्या उपचारांनंतर ते भारतात परतले होते. मुंबईत आल्यानंतर चाहत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं होतं. भारतात परतल्यानंतरही त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी नव्हती. अनेकदा त्यांना श्वसनाचे त्रास जाणवले. बुधवारी त्यांना सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. आज सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी त्यांची प्राण ज्योत मालवली. दोन वर्ष ते ल्यूकेमिया आजाराशी लढा देत होते.
अभिनेते ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली होती. फक्त भारतच नाही तर जगभरात ऋषि कपूर यांचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ऋषी कपूर यांनी वडिलांच्या चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती.