#चर्चेतली बातमी : मोदींना अनफॉलो का केले ? व्हाईट हाऊस कडून आले हे उत्तर ….
भारतातील सोशल मीडियावर चर्चा चालू असलेल्या विषयावर अखेर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाउसने उत्तर दिले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हाइट हाउसने ट्विटरवर अनफॉलो केल्यानंतर देशभरात अनेक उलट -सुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच आता व्हाइट हाउसच्यावतीने याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान या विषयावर आपली प्रतिक्रिया देताना , व्हाइट हाउसने बुधवारी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर होते. या दरम्यान, व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि भारतातील अमेरिकी दूतावासाच्या ट्विटर अकाउंटला फॉलो केले. या आठवड्यातच या सहा ट्विटर अकाउंटला अनफॉलो करण्यात आले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यावेळी एखाद्या देशाच्या दौऱ्यावर जातात. तेव्हा व्हाइट हाउसकडून त्या यजमान देशाचे प्रमुख आणि अधिकाऱ्यांच्या ट्विटर हॅण्डलला फॉलो केले जाते. त्यामुळे या दौऱ्याच्या निमित्ताने संबंधित देशांकडून दौऱ्याच्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या सकारात्मक ट्विटला रिट्विट करता येईल.