#CoronaVirusEffect : सावधान : वेळेवर पोलिसांची एंट्री झाली म्हणून “ती” बलात्कारातून वाचली अन्यथा, लॉकडाऊन असतानाही माॅर्निंग वाॅकचा छंद आला होता मुळावर !!

पोलीस कर्मचारी विजय पवार
औरंगाबाद – शहानूरमिंया उड्डाणपुलावर आज पहाटे साडे सात वा. माॅर्निंगवाॅक करणार्या एका महिलेवर एका मोटरसायकलस्वाराने एकटी महिला पाहून बलात्काराचा प्रयत्न केला पण समोरुन येणार्या पोलिसाने हा प्रयत्न हाणून पाडला.पिडीतेने या बाबतीत तक्रार ने देता घरी जाणेच पसंत केले. हा गुन्हा घडू न देण्याचे श्रेय पोलिस हेडकाॅन्सटेबल विजय पवार यांना जाते. विजय पवार हे उस्मानपुरा डिव्हीजन मधील सहाय्यक पोलिसआयुक्त कार्यालयात काम करतात. लाॅकडाऊन च्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये असे पोलिसांनी कितीही समजावून सांगितले तरी काही अति शहाणे लोक कोणाचेही ऐकत नाहीत. त्याचे दुष्परिणाम मात्र एखाद्याला बरेच भोगावे लागतात. त्याचाच प्रत्यय आज या घटनेतील पिडीतेला आला.
त्याचे असे झाले कि , आज सकाळी साडेसात वा. माॅर्निंगवाॅकला जाणार्या तापडियानगरातील महिलेला एकटे पाहून गोदावरी हाॅटेलच्या बाजूने नराधम मोटरसायकलवर एकटा आला. महिलेजवळ येताच स्वता:चे कपडे काढले व महिलेवर झडप घालून तिचे कपडे फेडण्याच्या तयारीत असतांना त्या महिलेने आरडाओरडा केला. त्याचवेळेस पोलिस कर्मचारी विजय पवार त्याठिकाणाहून जात होते. पवार जवळ येत असल्याचे पहाताच तो नराधम मोटरसायकलला किक मारुन पसार झाला.घाबरलेल्या पिडीतेला पवार यांनी पाणी दिले. सातारा पोलिस ठाण्यात आणले.या नराधमाला पिडीतेने कधीही यापूर्वी पाहिले नसल्याची माहिती तिने दिल्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले. व तक्रार देण्याचे टाळले. त्यानंतर पवार यांनी स्वता: पिडीतेला घरी नेऊन सोडले. पोलिस कर्मचारी विजय पवार यांच्या प्रसंगावधान राखण्याचे वरिष्ठांनी कौतूक केले.
दर्गा रोड भागात सकाळी आणि रात्रीच्या वेळी फिरायला येणारे लोक कोणत्याही सूचना पाळायला तयार नाहीत. यामध्ये पुरुषांबरोबर अनेक महिलाही आहेत. तर बरेच नागरिक कुत्र्यांना घेऊन तर काही नागरिक लहान मुलांना घेऊन स्वतः फिरायला येतात किंवा त्यांच्यासोबत रस्त्यावर खेळतात. पोलिसांची गाडी आली तर घरात पळून जातात. स्वतःला सुशीक्षीत म्हणविणारे लोक अशा पद्दाथीने वागताना दिसत आहेत. आणि पोलिसांनी चोप दिल्यानंतर पोलिसांच्या विरोधात तक्रारी करताना दिसून येतात.