Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खैरलांजी हत्याकांड प्रकरणातील आणखी एका दोषीचा मृत्यू…

Spread the love

बहुचर्चित खैरलांजी हत्याकांडातील मुख्य आरोपींपकी एक असलेला आणि नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका दोषीचा गुरुवारी मृत्यू झाला. सक्रु महाबू बिंजेवार (६१, रा. खैरलांजी मोहाडी, भंडारा) असे या दोषीचं नाव आहे. दरम्यान, खैरलांजी दलित हत्याकांडातील दोन दोषींचा आतापर्यंत कारागृहात मृत्यू झाला आहे. यात सक्रुचा आणि अन्य एक दोषी विश्वनाथ हगरू धांडे या दोघांचा समावेश आहे. धांडेचा मृत्यू नोव्हेंबर २०१७ मध्ये झाला होता. त्याचाही मृत्यू प्रकृती अस्वास्थामुळेच झाला होता.

खैरंलाजी हत्याकांड प्रकरणी सुरुवातीला जिल्हा न्यायालयात १५ सप्टेंबर २००८ रोजी ज्या आठ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यात सक्रुचेही नाव होते. पुढे उच्च न्यायालयात सहा जणांची फाशी रद्द करून त्यांना २५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यात सक्रुचाही समावेश होता. तो कारागृहात शिक्षा भोगत असताना ७ एप्रिल रोजी त्याचा प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला मेडीकल हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. त्याचा गुरुवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!