Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : औरंगाबादकर खबरदार !! आता सायंकाळी ५ ते रात्री ११ रस्त्यावर याल तर … हॉटस्पॉट जिल्ह्यांतून येणारांसाठी शहरबंदीचाही आदेश

Spread the love

अन्..सायंकाळी पाच वाजेच्या ठोक्याला शहर झाले कुलूपबंद । पोलिस अधिका-यांसह कर्मचारी उतरले रस्त्यावर । संचारबंदीची काटेकोर अमंलबजावणी सुरू

विनाकारण फिरणा-या वाहनावर करणार सक्तीने कारवाई – सहाय्यक आयुक्त डॉ. कोडे
संध्याकाळी ७ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान लागू करणा-या संचारबंदी ची वेळ बदलून आता संध्याकाळी ५ ते रात्री ११ अशी करण्यात आली आहे. संध्याकाळी ५ वाजेनंतर संचारबंदी ची कडक अमलबजावणी करण्यात येणार आहे. संध्याकाळी ५ वाजेनंतर रस्त्यावर विनाकारण फिरणा-या वाहन धारकावर सक्तीने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ नागनाथ कोडे यांनी दिला आहे. दरम्यान महापालिका आयुक्त यांनी हॉटस्पॉट घोषित केलेल्या भागातून औरंगाबाद शहरात प्रवेश परवानगीशिवाय प्रवेश करता येणार नाही असे आदेश निर्गमीत केले आहेत.


औरंंंगाबाद शहरातील  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लावण्यात आलेली संचारबंदी शुक्रवारपासून (दि.१७) कडक करण्यात आली आहे. सायंकाळी ५ ते रात्री ११ यावेळेत शहरातील दवाखाने आणि मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले आहेत. पोलिस आयुक्तांच्या आदेशाला प्रतिसाद देत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या ठोक्याला शहर कुलूपबंद झाले असल्याचे चित्र दिसून आले. शहरातील विविध चौकात वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी संचारबंदीची सक्तीने अमंलबजावणी करतांना दिसून आले.

कोरोना विषाणूने शहराला आपल्या विळख्यात घेतले आहे. शहरात आजघडीला जवळपास २५ कोरोनाबाधीत रूग्णावर उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढी असतांना देखील संचारबंदीच्या काळात शेकडो वाहन चालक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे आढळून आल्यावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशानुसार संध्याकाळी ७ ते रात्री ११ यावेळेत गेल्या ८ दिवसापासून संचारबंदी कडक करण्यात आली आहे. संध्याकाळी लागू करण्यात येत असलेल्या संचारबंदीची वेळ १७ ते १९ एप्रिल असे ३ दिवसासाठी बदलण्यात आली आहे. संध्याकाळी ५ ते रात्री ११ वेळेत शहरातील दवाखाने आणि मेडिकल स्टोअर्स वगळून सर्व व्यापारी प्रतिष्ठाणे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या ठोक्याला शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, पेट्रोलपंप, भाजीपाला विक्रीची दुकाने, फळ विक्रीची दुकाने, किराणा मालाची दुकाने, चिकन-मटन विव्रेâत्यांनी आपआपली दुकाने बंद केली होती. त्यामुळे शहराच्या विविध भागातील रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. तसेच रस्त्यावर फिरणाNया वाहनधारकांची चौका-चौकात नाकाबंदी करून पोलिस चौकशी करीत होते. वरिष्ठ पोलिस अधिकाNयांसह कर्मचारी शहरातील विविध जावून शहरवासीयांना आपल्या घरातच रहा असे आवाहन करीत फिरत होते.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!