Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : औरंगाबाद विभागात ४२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद विभागांतर्गत आठ जिल्ह्यांमध्ये एकूण ४२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्‍यापैकी औरंगाबाद येथे २८ रुग्‍ण (दोन रुग्‍णाचा मृत्‍यू झालेला आहे व दोन रुग्‍ण बरा झाल्‍यामुळे डिस्‍चार्ज देण्‍यात आले आहे), जालना-१, परभणी-१, हिंगोली- १, लातूर ८ आणि उस्‍मानाबाद येथे ३ रुग्‍णांचे निदान झाले आहे. तसेच बीड जिल्‍हयातील आष्‍टी येथील एक रुग्‍ण अहमदनगर येथील रुग्‍णालयात दाखल आहेत.

तपासणीसाठी आजपर्यंत एकूण नमुने २८७४ नमूने घेण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी २५८७ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून २५० चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी २५४५ नमुने निगेटीव्ह आहेत व ४२ नमुने पॉझिटीव्ह आहेत. ३७ नमूने मानांकानुसार नसल्‍याने परत करण्‍यात आले आहेत. आतापर्यंत एका रुग्‍णाला कोराना विषाणू संक्रमणातून बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. विभागामध्‍ये सध्‍या ३३५६ व्‍यक्‍तींना घरीच विलगीकरणात व ५८४ व्‍यक्‍तींना संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍यात आले आहे. तसेच १२९२ व्‍यक्‍तींना अलगीकरण कक्षात (Isolation ward) ठेवण्‍यात आले आहे.

स्‍थलांतरित मजुरांसाठी विभागामध्‍ये सध्‍या २१८ मदत शिबीरे उभारण्‍यात आली आहेत. या मध्‍ये सध्‍या २०२६७ स्‍थलांतरीत मजुर वास्‍तव्‍यास आहेत. या मजुरांच्‍या जेवणाची, वैद्यकीय तपासणीची व इतर अनुषंगीक बाबींची व्यवस्था या शिबीरामध्ये करण्‍यात आलेली आहे. विभागातील १२९ शिवभोजन केंद्रामधून ५/- प्रति थाळी प्रमाणे १३७५० थाळया वितरीत करण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे. विभागातील शासकीय गोदामांमध्‍ये १७ एप्रिल रोजी एकुण ४७ मे.टन इतका अन्‍यधान्‍य, साखर इत्‍यादीचा साठा आहे. विभागात प्राधान्‍य कुटूंब योजना व एपीएल शेतकरी योजने अंतर्गत नियमित धान्‍य वाटप करण्‍यात येत असून या व्‍यतिरीक्‍त प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत प्रति व्‍यक्‍ती ५ किलो मोफत तांदुळ एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी वितरीत करण्‍यात येत आहे.

विभागामध्‍ये आढळून आलेल्‍या कोरोना बाधीत रुग्‍णांच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्तिंचाही पाठपुरावा करण्‍यात येत असून आतापर्यंत अशा १५१६ व्‍यक्तिंना शोध घेण्‍यात आलेला आहे. यापैकी ५५९ लोकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामध्‍ये ३२ नमुने पॉजिटिव्‍ह, ४६० नमुने निगेटिव्‍ह चे अहवाल प्राप्‍त आहे व ६७ स्‍वॅबचे अहवाल प्रलंबित आहे.
विभागात को‍वीड-१९ मुळे उद्भवलेल्‍या आजारावर प्रतिबंध व उपचारास्‍तव १२२ (जालना-१०, नांदेड येथील शासकीय रुग्‍णालयासाठी १० व वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ असे एकुण २५, हिंगोली-८, बीड-२०, लातूर-८, उस्‍मानाबाद-३६, औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय साठी ५ व बीड येथील स्‍वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालय अंबाजोगाई साठी १०) व्‍हेंटीलेटरखरेदी करण्‍याबाबत शासनाकडून मान्‍यता देण्‍यात आलेली असून उर्वरीत जिल्‍हयांकरीता खरेदी करण्‍याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

केंद्र शासनाचे आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण मंत्रालय विभागामार्फत राज्‍यातील संशयीत / बाधित कोवीड-१९ रुग्‍णांवर योग्‍य व्‍यवस्‍थापन करण्‍याबाबत मार्गदर्शक सुची सादर केलेली आहे. सदर सुचीनुसार तीन प्रकारच्‍या कोविड समर्पित सुविधा (Covid Dedicated Facilities) प्रस्‍तावित केलेल्‍या आहेत. सदर सुविधांमध्‍ये 1. Covid Care Center (CCC)-सौम्‍य व अतिसौम्‍य संशयित अथवा बाधित कोविड रुग्‍णाकरीता सुविधा पुरविण्‍यात येईल असे केंद्र, 2.Dedicated Covid Health Center (DCHC)-वैद्यकीयदृष्ट्या मध्यम म्हणून नियुक्त केलेल्या अशा सर्व प्रकरणांची काळजी घेणारी रुग्णालये व 3. Dedicated Covid Hospital (DCH)- ज्‍या रुग्‍णांना वैद्यकीयदृष्‍टा गंभीर व बाधित म्‍हणुन नमुद केलेले आहे अशा रुग्‍णांकरीता प्रामुख्याने सर्वसमावेशक काळजी घेईल अशी रुग्‍णालये स्‍थापन करण्‍याबाबत सुचित केलेले आहे. त्‍यानुसार विभागात एकुण १५५ Covid Care Center (CCC) ज्‍यामध्‍ये एकुण ७०४६ खाटांची क्षमता आहे, ४७ Dedicated Covid Health Center (DCHC) ज्‍यामध्‍ये एकुण १९४० खाटांची क्षमता आहे व २० Dedicated Covid Hospital (DCH) ज्‍यामध्‍ये एकुण २२७० खाटांची क्षमता आहे, अशी सुविधा तयार करण्‍यात आलेली आहे.

कारोना विषाणूमुळे उद्भवलेल्‍या परिस्थिीत संदर्भात कोणत्‍याही नाग‍रिकास काही मदत, तक्रार अथवा सुचने संदर्भात संपर्क साधावयाचा असल्‍यास ते खालील हेल्‍पलाईन नंबरवर संपर्क साधू शकतील.

१ औरंगाबाद औरंगाबाद जिल्‍हाधिकारी कार्यालय ०२४०- २३३१०७७
2 नांदेड नांदेड जिल्‍हाधिकारी कार्यालय ०२४६२- २३५०७७
3 जालना जालना जिल्‍हाधिकारी कार्यालय ०२४८२- २२३१३२
4 बीड बीड जिल्‍हाधिकारी कार्यालय ०२४४२- २२२६०४
5 परभणी परभणी जिल्‍हाधिकारी कार्यालय ०२४५२- २२६४००
6 उस्‍मानाबाद उस्‍मानाबाद जिल्‍हाधिकारी कार्यालय ०२४७२- २२५६१८
7 हिंगोली हिंगोली जिल्‍हाधिकारी कार्यालय ०२४५६- २२२५६०
8 लातूर लातूर जिल्‍हाधिकारी कार्यालय ०२३८२- २४६८०३
9 विभागीय आयुक्‍त कार्यालय, औरंगाबाद- ०२४०- २३४३१६४

विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी वेळोवेळी औरंगाबाद येथील जिल्हा ग्रामिण रुग्णालय व घाटी येथील सुपरस्पेशॅलिटी हॉस्पीटल येथे भेटी दिलेल्या असून तेथील रुग्णांची व तेथील सोयी सुविधांची पाहणी करुन आवश्यक त्या सुचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जालना व लातूर येथील रुग्णालयांना भेटी देऊन तेथील रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांची पाहणी करुन आवश्यक सुचना दिलेल्या आहेत. विभागीय आयुक्‍त औरंगाबाद यांनी ८ एप्रिल रोजी परभणी, नांदेड व हिंगोली जिल्‍ह्यांना भेट देवून जिल्‍हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून कोरोना संदर्भीय केलेल्‍या उपाय योजना व सद्यस्थितीबाबत आढावा घेतला आहे तसेच सर्व संबंधीत यंत्रणांना आवश्‍यक त्‍या सुचना दिलेल्‍या आहेत.

मिनी घाटीतल्या १३१ रुग्णांची कोविड तपासणी निगेटिव्ह; आज १०२ जणांची तपासणी

औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) आज १०२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर काल आणि आजचे मिळून रुग्णालयात दाखल झालेल्या १३१ रूग्णांची कोविड तपासणी निगेटिव्ह आली, त्यांना आज आवश्यक औषधींचा सल्ला देऊन घरी पाठवल्याचे रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी म्हणाले.
१९ (कोरोना) संसर्गामुळे औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत २८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. (दोन रुग्‍णाचा मृत्‍यू झालेला आहे व दोन रुग्‍ण बरे झाल्‍यामुळे डिस्‍चार्ज देण्‍यात आले आहे) जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) २२, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात एक अशा एकूण २४ कोरोनाबाधित रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
मिनी घाटीत आज तपासण्यात आलेल्यांपैकी ५२ जणांच्या लाळेचे नमुने शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे पाठवले होते. तसेच १४ दिवस पूर्ण करणाऱ्या ०९ कोविड रुग्णांचेही लाळेचे नमुने घेण्यात आलेले आहेत. सध्या रुग्णालयात १९ जणांना भरती करून देखरेखीखाली ठेवलेले आहे. तर २३ जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिलेला आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.
घाटीत ३२ रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत घाटीत ३२ रुग्ण भरती आहेत. त्यामध्ये संशयित कोविड ११ रुग्ण, कोविड निगेटिव्ह २० आणि एका पॉझिटिव्ह (वर उल्लेख असलेल्या) रुग्णाचा समावेश आहे. घाटीत आज २५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. १० जणांच्या लाळेचे नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहेत, असे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!