Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusLatestUpdate : ताजी बातमी : राज्यात १२ तासात ८६ नवे रुग्ण , मुंबईत ५९ , औरंगाबादेत ४ , देशातील रुग्णांची संख्या ९१५२ तर ३०८ मृत्यू

Spread the love

महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण रुग्णांची संख्या १९८५ ,  बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २१७ तर मृत्यूंची संख्या १४९ दाखविण्यात आली आहे .  गेल्या १२ तासांत राज्यात ८६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या २०६८ वर पोहोचली आहे. यात मुंबईतील सर्वाधिक ५९ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान देशातील करोना रुग्णांची संख्या ९,१५२ वर पोहोचली. तर एकूण मृतांची संख्या ३०८ झालीय. गेल्या २४ तासांत ३४ जणांचा करोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

काल रविवारी राज्यात १९८२ रुग्ण होते. त्यात आता ८६ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा २०६८ झाला आहे. गेल्या १२ तासांत मुंबईत ५९, मालेगावमध्ये १२, ठाण्यात ५, पुण्यात ३, पालघरमध्ये दोन , औरंगाबादमध्ये ४ आणि वसई-विरारमध्ये एक रुग्ण सापडला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड, नागपूर, यवतमाळ, जळगाव येथून मात्र  गेल्या १२ तासांत एकही रुग्ण आढळल्याचे वृत्त नाही. औरंगाबादमध्ये जे ४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये अरिफ कॉलनी , पुरुष वय ७० , किराडपुरा २ , एक मुलगी वय ११ आणि आई वय -३३ आणि देवळाईमध्ये १ महिला वय ३० या रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण या पूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नातेवाईक आहेत.

दरम्यान, मुंबईच्या धारावीत आज सापडलेल्या चार नव्या रुग्णांपैकी एका ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. हा रुग्ण धारावीच्या नेहरू चाळमध्ये राहतो. तर इतर तीन रुग्णांपैकी एक रुग्ण इंदिरा नगर, जनता हौसिंग सोसायटी आणि गुलमोहर चाळीत राहतात. यात दोन महिलांचा समावेश आहे. करोनाची लागण झालेली गुलमोहर चाळीतील ३४ वर्षीय महिला दादरच्या सुश्रृषा रुग्णालयात नर्स आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या शिवाय त्यांच्या कुटुंबीयांचे सँपल घेण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. तसेच बॉम्बे हॉस्पिटलमधील एका डॉक्टरलाही करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाचा विळखा, शहरातील आणखी चौघांना झाली कोरोनाची लागण
कोरोनाबाधीत रूग्णसंख्या गेली २४ वर

औरंंंगाबाद : दोन दिवसांच्या गॅप नंतर सोमवारी (दि.१३) शहरात पुन्हा चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरेफ कॉलनी, किराडपुरा व देवळाई भागात हे रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे चारही जण हे कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळचे नातेवाईक असून त्यांच्या संपर्कात आल्याने चार जणांना बाधा झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
सोमवारी आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये देवळाई येथील कोरोनाबाधित ड्रायव्हरची पत्नी (वय ४०), किराडपुरा येथील रुग्णाची पत्नी (वय ३५) व मुलगी (वय ११), तर आरेफ कॉलनी येथील पुण्याहून आलेल्या कोरोनाबाधित अभियंत्याचे आजोबा वय (वय ७०) यांचा समावेश आहे. औरंगाबादेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २४ वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने प्रशासनाच्या चितेंत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात शुक्रवारी सिडकोतील यादव नगरात एक व सातारा परिसरात एक असे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर दोन दिवसात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आला नाही. त्यामुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, सोमवारी पुन्हा चार रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे औरंगाबादचा रेड झोन मध्ये समावेश असल्याने लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. शहरातील कोरोनाबंधितांची दिवसेंदिवस वाढणारी संख्येमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २४ वर गेली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला आहे तर एक महिला रुग्ण ठणठणीत बरी झाली आहे.


शहरवासीयांनी काळजी घ्यावी – डॉ. सुंदर कुलकर्णी
आतापर्यंत शहरात जे काही कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत ते कोरोनाबाधीत रूग्णांचे नातेवाईक व आप्तस्वकीय आहेत. कोरोनाबाधीत रूग्णांच्या नातेवाईक व आप्तस्वकीयासह बाहेरच्या कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. शहरवासीयांनी सतर्वâ राहुन स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सवक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी केले आहे.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!