Aurangabad News Update : “हि” बातमी दिव्यांगांपर्यत पोहोचावा…. आणि अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनाचे हेल्पलाईन क्रमांक नोंदवून घ्या….

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा दिव्यांग सहायता कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षाचा संपर्क क्रमांक 0240-2331572/3/4/5 आहे. तरी दिव्यांगांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. जीवनावश्यक वस्तूसाठी संपर्क साधवा. तर औरंगाबाद शहरातील दिव्यांगांनी 8956306007 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या आदेशानुसार संचारबंदी काळात हालचाल करू न शकणाऱ्या दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तू, आरोग्यविषयक बाबी, भोजन आदी व्यवस्था संबंधित यंत्रणांमार्फत करून घेण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कक्षामार्फत मनपा, नगर परिषद, पंचायत समितींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गरजवंत दिव्यांगांना तत्काळ योग्य ती मदत करण्याबाबत सूचना करण्यात येतील, असेही जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.