Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले मोदी आणि भारतीयांचे आभार , त्यावर मोदींनी दिले हे उत्तर….

Spread the love

देशभर पसरत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने  अमेरिकेला हायड्रोक्झीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. विविध देशांमध्ये मलेरियावर वापरलं जाणारं एचसीक्यू हे औषध करोनावर उपचारासाठी वापरलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही हे औषध अमेरिकेला पुरवण्यात यावं यासाठी विनंती केली होती. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटला प्रतिसाद देताना , ” अशीच वेळ मित्रांचा अधिक जवळ आणते…. भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी दृढ होतील, मानवतेच्या करोना विरोधातील लढाईत भारत भारत शक्य ते सर्व करेल. आपण ही लढाई एकत्र जिंकू असे म्हटले आहे.

आपल्या ट्विटमध्ये आभार मानताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘संकटकाळात मित्रांचं सहकार्य महत्त्वाचं असतं. एचसीक्यूच्या निर्णयाबद्दल भारतीय आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार. आम्ही हे कधीच विसरणार नाही. पंतप्रधान मोदींच्या कणखर नेतृत्त्वामुळे करोनाविरुद्धच्या लढ्यात फक्त भारताचीच नाही, तर जगाची आणि मानवतेचीही मदत होत आहे.’ जगावर आलेल्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या दृष्टीकोनातून भारताने पॅरासिटामोल आणि एचसीक्यू निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. शेजारी राष्ट्रांसह या औषधाची आवश्यकता असलेल्या इतर देशांनाही औषध दिलं जाईल, विशेषतः करोनाचा जास्त फटका बसलेल्या देशांना पुरवठा होईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे नवनियुक्त प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी मंगळवारी दिली.

दरम्यान ब्राझिलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांनी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलल्यामुळे आपल्याला एचसीक्यूची निर्मिती तयार करण्यासाठी आवश्यक असलेलं रॉ मटेरियल मिळणार आहे. यामुळे एचसीक्यूची मोठ्या प्रमाणात निर्मिती करुन करोनाविरुद्धच्या लढ्याला आणखी बळ येईल, असं ते म्हणाले. करोनाचा सर्वात जास्त कहर असलेल्या देशांमध्ये स्पेनचाही समावेश आहे. भारत आता स्पेनच्या मदतीला धावणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची आणि स्पेनच्या परराष्ट्र मंत्री अरंचा गोंझालेझ यांच्यात बातचीत झाली. स्पेनच्या वैद्यकीय गरजा तातडीने पूर्ण करण्याबाबत आपण तयार असल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!