Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदींनी त्यांच्या सन्मानार्थ ५ मिनिटे उभे राहण्याची योजना मांडणाऱ्या भक्तांना दिला हा मोलाचा सल्ला…

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी  Covid – 19 ला आटोक्यात आणणारे डॉक्टर्स , आरोग्य कर्मचारी , २४ तास कार्यरत असणारे पोलीस यांच्या प्रती  आदर म्हणून देशातील प्रत्येक नागरिकाला टाळ्या आणि थाळ्या वाजविण्यास मोदी यांनी भाग पडले होते . त्यानंतर ५एप्रिल रोजी त्यांनी देशातील एकजुटीसाठी देशवासियांना मेणबत्या आणि दिवे लावण्याचे आवाहन केले . याच मालिकेत लोकांनी अर्थात भाजपच्याच काही मोदींवर प्रेम करणाऱ्या भक्तांनी मोदींच्या सन्मानार्थ ५ मिनिटे शांत राहण्याची मोहीम सुरु केली आहे . दरम्यान याची भनक लागताच पुन्हा कोणाला टीकेची संधी नको म्हणून ट्विट केले आहे कि , ” मला वादात अडकवण्याचा प्रयत्न करू नका, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही खोडसाळांना सुनावले आहे. मोदींनी या संदर्भात ट्विट केले आहेत. त्यात पंतप्रधान मोदींनी त्यांना सल्लाही दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात दोन ट्विट केली आहेत. पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ ५ मिनिटं शांत उभे राहा, अशी मोहीम काही लोकं चालवत असल्याचं आपल्या लक्षात आलं आहे. प्रथमदर्शनी हा सर्व प्रकार मला वादात अडकवण्यासाठीचा एक खोडसाळपणा असल्याचं वाटतंय, असं मोदींनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तरीही सदिच्छा म्हणून कुणी हे करत असेल, माझ्याबद्दल एवढं प्रेम असेल आणि मोदीचा सन्मान करायचा असेल तर करोना व्हायरसचे संकट आहे तोपर्यंत किमान एका गरीब कुटुंबाची जाबाबदारी घ्या. माझ्यासाठी यापेक्षा मोठा सन्मान कुठलाच नसेल, असं पंतप्रधान मोदींनी ट्विटमधून स्पष्ट केलंय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!